लघुकथा – ” गुरु”.

#माझ्यातलीमी
लघुकथा टास्क (२४/१०/२५)

खाली दिलेल्या वाक्यावरून लघुकथा कथा लिहा.
वाक्य :- ” खरं नातं एका चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही “.

लघुकथेच शीर्षक :- ” गुरु”.

चाळीस वर्षानंतर माझ्या आवडत्या शिक्षकांना (नानां ना) भेटण्याचा योग आला. नानांना भेटलो. त्यांची देहयष्टी थकलेली, हाताला सुरकुत्या पडलेल्या पण त्यांच्या डोळ्यातील तेज आणि आपुलकी तशीच होती.
“नाना, जग किती बदललंय ना? मला वाटलं एवढ्या वर्षात आपलं नातंही बदललं असावं.” मी हळू आवाजात म्हणालो.

नाना हसले, त्यांनी टेबलावर चा जुना भगवत गीतेचा खंड उचलला,” अविनाश! हे पुस्तक बघ. याच्या वरती धूळ बसली असेल, पण त्यातला एकही” शब्द” बदललेला नाही.

ते थोडे गंभीर झाले म्हणाले,” बाळा, नातं हेही एका चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीच बदलत नाहीत रे!”. आपलं नातं फक्त शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नव्हतं ते,” ज्ञानाचे” होतं. माझे तुझ्यावरचे प्रेम आणि तुझ्या मनात माझ्या विषयीचा असलेला आदर हे आपल्या नात्याचं मूळ आहे.

त्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला,” काळा -वेळेने शरीरावर आणि परिस्थितीवर परिणाम केला असेल पण माझ्या शिकवणीचा,” आशय” आणि नात्याचा,” अर्थ” आजही नवीन आहे त्यात कधी बदल होणार नाही.

मला समजलं, त्यांच्या शिकवणीतून मिळालेलं जीवनमूल्य आजही माझ्या प्रत्येक निर्णयाला दिशा देत आहे. काळाच्या पडद्याआड गेलेले, दडलेले हे नातं एखाद्या प्राचीन ग्रंथाप्रमाणे अमूल्य आणि शाश्वत होत.

ज्याप्रमाणे गुरुने दिलेले ज्ञान आणि पुस्तकातील विचार चिरकालीन टिकतात त्याचप्रमाणे विश्वास, प्रेम आणि आधारावर आधारित नाती वेळेच्या कसोटीवर नेहमीच खरी उतरतात. त्यांची सत्यता कधीही बदलत नाही.

शब्द संख्या :- १९५.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

error: Content is protected !!