#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क (२३/१०/२५)
#लघुकथा
#दुरितांचेतिमिरजावो
#जिद्दीनृत्यांगना
💃 जिद्दी नृत्यांगना 💃
अंजू एका लहानशा गावीतील मुलगी. दिसायला खूप सुंदर, मनमिळावू, गुणी, सर्वगुणसंपन्न. साऱ्या कलागुणात पारंगत. मात्र अभ्यासात जेमतेमच. नृत्याची तिला भारी आवड. सारे तिला म्हणायचे, “नाचून काय दिवे लावणार आहेस. चांगला अभ्यास करून खूप शिकलीस तर चांगल्या पगाराची नौकरी लागेल.”
तिचं एकच उत्तर असायचं.. नापास तर नाही होत ना? एकेक वर्ग येतेय ना पुढे. आणि मी डान्स मधेच करिअर करणार.” आजही गावांमध्ये मुलींना नाचण्यास बंदीच असते.
अंजू बाकी सगळ्या गोष्टीत तरबेज असल्याने मग कुणी तिला जास्त काही बोलायचे नाही. अनेक आंतरशालेय नृत्य स्पर्धेत तिचा क्रमांक यायचाच! त्यामुळे तिचे ध्येय पक्के होते .. नृत्यातच करिअर करायचं.
अंजू बारावीत असताना कॉलेज तर्फे ट्रेकिंग साठी गेली होती. आपल्या मैत्रिणीचा तोल जातोय बघून तिला हात द्यायला गेली, मैत्रीण तर सावरली पण ती जोरदार खाली पडली. हातपाय सगळीकडे इजा झाली. पायाचे फ्रॅक्चर झाले. आता तिला बरोबर चालताही येईना. सगळीकडे अंधःकार.. तिचे स्वप्न धुळीस मिळाले. पण ती खचली नव्हती. मनाने खंबीर होती. एक दोन वर्ष व्यवस्थित उपचार घेऊन आता ती बरी झाली होती. पण नृत्य..!! डॉक्टरांनी पण डान्स सुरू करण्यास मनाई केली.
पण खचून जाईल ती अंजू कसली. तिने हिम्मत एकवटली. योगाभ्यास, ध्यान करू लागली. पायांच्या दुखण्यावर मन एकवटून पाय स्ट्राँग होत आहेत ही भावना जागृत केली. परत डान्स क्लास मधे प्रवेश घेतला. जास्तीत जास्त वेळ ती आपल्या सरावाला देऊ लागली.
तिच्या या अतोनात प्रयत्नाला यश मिळणं सहाजिकच होतं. ती परत आधीपेक्षाही चांगले नृत्य सादर करू लागली आणि उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून प्रसिध्दीस आली
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे.

