#शीर्षक_मोल_नाट्यछटा
#पात्र_परिचय_
मनीषा_कामवली_ताई, मनीषा ची आई, मालकीण_ऐश्वर्या आणि तिच्या घरातील इतर सदस्य.
#त्या_लोकांना_तुमचं_मोल_कधीच_समजणार_नाही_ज्यांच्यासाठी_तुम्ही_नेहमी_हजर_राहता…!!(३००शब्द)
मनीषा _पत्र्याचे छप्पर असलेली चाळ , रेडिओ वर जुनी मराठी गाणी
#नशीबानी थट्टा आज मांडली.
मनीषा ची आई::- मनी,” बाईसाहेब ना आज थोडी उचल देता का?
म्हणून विचारुन बघ.
मनीषा::- आई काय लावलयस दर महिन्याला थोडी उचल मिळते का बघ किती ही पैसे आणा महिन्याच्या शेवटी तोंड लाभलेली असते.
त्या ऐश्वर्या ताई मला पुढे शिक्षण पूर्ण कर म्हणून पाठी लागल्यात आणि तू आहेस की शिकून मोठी ऑफिसर होणार आहेस असं म्हणतेस. आई! त्यांना जेवढं माझ्या बद्दल वाटत त्याच्या एक पटीने
जर माझी व्यथा तुला कळली असती ना तर किती बरं झालं असतं गं!
आई:::-मग जाऊन कायमची राहात का नाहीसं त्यांच्या कडे ;त्या तुझं सगळं चांगलच करतात ना. इथे खाणारी तोंड जरी दोन तीन असली तरी तुझ्या पेंदाड बाबांचं काय करू, तुझ्या शिक्षणा पेक्षा मिलिंद चे शिक्षण झाले पाहिजे हे कसं तुला कळत नाही.
मनीषा::- आई विचार तुझ्या मिलिंद ला तो शिक्षणाच्या नावाखाली कुठे कुठे दिवे लावत फिरतोय.मग कळेल तुला ; डोळे उघड आणि क आजुबाजुला काय चाललंय ते कान उघडे ठेवून एक म्हणजे कळेल तुला तु कोणत्या व्यक्तीला पाठीशी घालतेस .जाऊ दे ना! तुझ्या पुढे बोलण्यात काही अर्थ नाही बघ!
आई::- नकोच बोलूस फक्त तेवढं पैशांचे काय ते बघ म्हणजे झालं.
मनीषा::- डबा पिशवीत भरून तरातरा घरातून निघून बाहेर कामा साठी चालली जाते.
ऐश्वर्या ताई चा बंगला::- गेटवर वाॅचमन बोलतो बेबी आज उशीर झाला.
मनीषा::- हो ना! काका पहिली बस चुकली, आमच्या चाळीत पाणी येत नाही आली तर तु …तु…. मैं..मैं. मध्ये च पाण्याची वेळ निघून जाते. डबा करून घेईल येईल पर्यंत इकडे बस जाते,बस काय आपल्या बापाची आहे थोडी!
वाॅचमन::- जा बेबी दोन वेळा ताईसाहेबांचा फोन येऊन गेला आहे. बेबी .. आली की आधी माझ्या रुम मध्ये पाठवून द्या.
मनीषा::- हो पहिल्यांदा ताई साहेबां कडेच जाते बघते काय म्हणतात.
मनीषा बंगल्यात प्रवेश करते.
पोर्च मधून हाॅल दिसतो उंची सोफा , खूप छान महाग वस्तू नी सजवलेला हाॅल
हाॅलच्या उजव्या बाजूला ताई साहेबांची खोली दरवाजा वाजवून मी आता येऊ का? म्हणून मनीषा विचारते.
ऐश्वर्या ताई साहेब::- ये गं आज उशीर झाला!
मनीषा::- हो ताईसाहेब,पहिली बस चुकली.आज पाण्याचा वापर म्हणजे आज कॉर्पोरेशन च पाणी येत ते भरुन यावं लागतं, आता दोन दिवसांनी येणार पाणी
ऐश्वर्या ताई साहेब::-असू दे मनीषा मी कामानिमित्ताने एक महिन्यासाठी मलेशियाला जाते.आज जरा थोड जास्त थांबून मला चिवडा शेव लाडू करंज्या चकल्या म्हणजे सर्व सामान आणले आहे .
सर्व थोड थोड च करायचं आहे.कसं आहे बाहेर सर्व मिळत गं पण थोडं घरगुती पदार्थ असले की कसं बरं वाटतं.तू असं कर घरी फोन करून सांग आज इथेच थांबते म्हणून!
मनीषा::-हॅलो आई मी आज ताईसाहेबांन कडेच थांबते.दिवाळीचा फराळ बनवायचाय; त्यासाठी ताई साहेबांनी थांबायला सांगितले आहे.
आई:::- बरं राहा पण पैशाचं बघ बाई जास्तीचे पैसे घे हो.ठेव फोन उगाच बिल नको वाढवून
ऐश्वर्या ताई साहेब::- काय म्हणाली आई,
मनीषा::- काही नाही राहा म्हणाली.
ऐश्वर्या ताई साहेब::-पैशांन विषयी काही तरी बोलत होती का तुझी आई!!
मनीषा::- नाही तर पण …
ऐश्वर्या ताई साहेब::- आलं माझ्या लक्षात म्हणजे या महिन्यात पण तुला जरा जास्तच पैसे हवेत ना!?
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कामावरून घरी जाताना.
मनीषा::- ताईसाहेब, “सर्व जिन्नस तयार करून पॅकिंग करून तुमच्या
बॅगेत भरून ठेवल्या आहेत”!.
ऐश्वर्या ताई साहेब::- बरं झालं बाई सगळं कसं वेळच्या वेळी करून दिलस मला आता फक्त बॅगा उचलून गाडीत ठेवायच्या आहेत बस.
हे घे पांढऱ्या रंगाचे इनव्हलप (पाकिट), मनीषा पुढे करत ऐश्वर्या म्हणते .
मनीषा::- ताई साहेब हे काय आहे.
ऐश्वर्या ताई साहेब::- काही नाही गं थोडे पैसे आहेत ,मी दिवाळीत इथे नाही मग आल्यावर देण्यात पेक्षा आधी च दिले तर कुठे बिघडले.
मनीषा::- मनातल्या मनात चरफडत म्हणते.इथे ताई साहेब आहेत ज्या मला समजून घेतात आणि तिथे माझी आई मला म्हणते पुढे शिकून काय करणार.लग्न करू दुसऱ्या कडेच तर जायचे आहे ना.
ऐश्वर्या ताई साहेब::- अगं कसला विचार करतेस घे हे पाकिट जास्त नाही दिले दिवाळी बोनस आणि तुच केलेल्या फराळाचे पदार्थ आहेत.
आई ला विचारलेस का? पुढच्या शिक्षणासाठी मी तुला मदत करणार आहे.मी मलेशिया वरुन आले की तुला फॅशन डिझायनरच्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे आहे.
मनीषा::- नाही अजून नाही विचारलं,पण विचारुन ठेवते.
ऐश्वर्या ताई साहेब::- आईला सांग मी सर्व खर्च करणार आहे.मला मुलगी नाही ही कमतरता देवाने तुझ्या रूपाने भरुन काढली आहे आणि म्हणूनच मी हे सर्व करणार आहे.
मनीषा संध्याकाळी चाळीत पोहोचते
आई::- मनी एवढा मोठा खोका गं कसला, दिवाळीची मिठाई देऊन केली काय; पण पैशाचं काय!! केव्हा देणार आहेत.मावशी चार फोन आला होता दोन दिवस मनीषा ला लावून दे म्हणजे पाठवून दे ! तेवढीच फराळाचे पदार्थ तयार करायला मदत होईल.आणि तिच्या कडून घेतलेले पैसे थोडे थोडे फिटतील.
मनीषा::- आई एक काम कर पुढल्या महिन्यात मी फॅशन डिझायनरच्या कोर्सला ऍडमिशन घेते , त्यासाठी पहिल्या सहामहिन्या साठी पन्नास हजार रुपये भरायचे आहेत तर त्यातले पंचवीस हजार रुपये मावशी कडून घेतेस का? थोडे थोडे करून मी तिचे सर्व पैसे परत करीन.
आई::- मनी तुला मी आधीच सांगितले की तुला काही शिकण्याची गरज नाही.तरी तू मला सांगतेस की मावशी कडे पैसे माग.मी काही नाही मागणार , तिला तिचे व्याप काय कमी आहेत का? आपल्या फाटक्या आभाळाला ती किती ढगळ लावणार.जा ते सर्व आत नेऊन ठेव.
मनीषा::- घरात येते समोर काॅटवर तिचे बाबा झोपलेले असतात काॅट खाली रिकामी बाटली आणि ग्लास , मनीषा बघितलं नाही असं करू आतल्या खोलीत निघून जाते.
आई ::- हॅलो बोला रे मह्या (महेश) आई मी आता येतोय माझ्या झणझणीत काहीतरी बनव इथं सर्व गुळमट खाऊन तोंडाची चव पार गेली आहे. बरं ते सावकाश माझ्या राजा बनवते झणझणीत,ठेवते हो फोन ये… ये.
मनीषा::- आता काय करायचं जेवायला डाळ भात की काय.
आई::- दे पैसे थोड सामान आणते महेश येतोय त्याला झणझणीत खायचं आहे .
मनीषा ::- आई हे बरं आहे तुझं लेकाला झणझणीत खायचं तर माझ्या कडून पैसे घेऊन त्याला खाऊ घालणार.मला आता कळून चुकले आहे की “ज्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही त्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता….!!
#सोमवार_१३_१०_२०२५
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

Mast
छान
तंत्रबद्ध शास्त्र शुद्ध संवाद व कथा