लघुकथा : “शांत बंड”
त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही… ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता.
सुमन च्या डोक्यात हे वाक्य अनेक दिवस घोळत होत.सहज डायरी चाळताना हे वाक्य तिच्या जुन्या डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं ते तिला दिसल.
ती एक साधी, मध्यमवर्गीय गृहिणी. दिवस तिचा सगळ्यांसाठी नवऱ्याची वेळ सांभाळणं, मुलांच्या गरजा भागवणं, वीजबिलं , शाळेच्या फिया अशी अनेक तत्सम काम करण्याची आठवण ठेवणं, आणि सासू सासऱ्यांची काळजी घेणं त्यांना औषध वेळेवर देणं.
पण कोणी तिला विचारलं नव्हतं “सुमन, तुला काय हवं आहे?”सगळ्यांनी तिला गृहीत धरल होत.
एका रविवारी ती नेहमीसारखी उठली, पण आज काही वेगळं केलं.
तिने सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि स्वतः बाहेर निघाली. बसने शहराच्या दुसऱ्या टोकाला गेली. समुद्राकाठी.
पहिल्यांदा तिने स्वतःसाठी वेलदोड्याचा चहा मागवला आणि समुद्राकडे पाहत बसली.
ती शांत होती, पण तिच्या आत एक बंड उसळत होतं “माझ्याशिवाय हे घर चालतं का?”मला सगळेजण का अशी वागणूक देतात.
संध्याकाळी परत आली तेव्हा घरात गोंधळ सगळ्यांना समजलं, आईशिवाय घर हे घर राहत नाही.
नवऱ्याने हळूच विचारलं, “कुठे गेली होतीस?”
ती फक्त म्हणाली, “थोडं स्वतःला भेटायला.”
त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं.
सगळे तिला ‘आई’ म्हणून नव्हे, ‘सुमन’ म्हणून पाहू लागले.
आणि ती?
ती अजूनही हजर होती… पण आता स्वतःसाठीही. 🌼

खूप सुंदर कथा
Ek no