प्रेमाचा वटवृक्ष

inbound5047637963405505306.jpg

#माझ्यातली मी
#लघुकथा लेखन
@everyone
           शीर्षक – प्रेमाचा वटवृक्ष
​सूर्य मावळत असताना, आठ वर्षांचा चिंटू आजोबांच्या कुशीत शिरला. त्याने विचारले, “आजोबा, तुम्ही नेहमी सगळ्यांचं करता पण काका-काकू फक्त गरज असेल तेव्हाच येतात. तुम्हाला वाईट नाही वाटत?”
                 ​आजोबांनी चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला एक गोष्ट सांगितली, “माझ्या बाळा, एका बागेत एक वडाचे झाड होतं , जे सगळ्यांना २४ तास सावली द्यायचं. तिथेच एक सुंदर गुलाबाचं झाड  होतं, जे फक्त त्याच्या सीजनला फुलं द्यायचं.
                    ​सगळे लोक वडाच्या सावलीत बसायचे, पण त्याचे आभार कधी मानले नाहीत. कारण, ‘ते तर नेहमी इथेच असतं,’ असं त्यांना वाटायचं. पण गुलाबाची फुलं पाहिल्यावर सगळे ‘वाह! किती सुंदर!’ म्हणायचे.
                   एकदा दुष्काळ पडला. बागेत उष्णता वाढली. गुलाबाच्या झाडाची फुलं सुकून गेली. पण लोकांना खरी आठवण झाली वडाच्या थंड सावलीची. आजोबानी डोळ्यात पाणी आणून म्हटले, त्यांना माझी किंमत कळाली नाही.’
       चिंटू, “आपल्या घरातील वड तुम्ही आहात ना, आजोबा?”
           ​बेटा, प्रेम आणि सेवा  वडाच्या झाडासारखे असते. जे नेहमी उपलब्ध असते, त्याचे महत्त्व लोक विसरतात. पण,  अनुपस्थितीच लोकांना त्याची खरी किंमत आणि आधार कळतो. मी नेहमी हजर राहतो, कारण मला माहीत आहे, माझी सावली आज नाहीतर उद्या तुम्हा सगळ्यांना आधार देणार आहे. आणि हेच माझ्या जगण्याचं मोल आहे.”
        चिंटू, “पण आजोबा तुमचे मोल त्यांना कधीच समजणार नाही.”
                  ​आजोबांच्या डोळ्यांत एक हलकासा ओलावा आला. चिंटूने त्यांना घट्ट मिठी मारली. त्याला कळाले, ‘नेहमी उपलब्ध असणे’ म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ते  ‘प्रेमाचा वटवृक्ष ‘असतात.                
शब्द संख्या 220 ~ अलका शिंदे

5 Comments

  1. जुनी पिढी भावनिक विश्वात केंद्र स्थानी ठेवायला हवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!