हरकाम्या

IMG_20251013_124845.jpg

#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन (१३/१०/ २५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

लघुकथा

हरकाम्या.
————

अंग काढून घेणे,जबाबदारी टाळणे किंवा कामातून माघार घेणे अशी प्रवृत्ती नसलेला तो हरकाम्या.

नातू मात्र नेहमीच म्हणायचा.. तो नसला तर नाही अडत काही. कुणाचं कुणावाचून असं अडत नसतं.
मी जाता राहील काय ..जन पळभर म्हणतील हाय हाय.

कडक शब्दांत हजेरी घेतली आजोबांनी.
“नको तुझी पोपटपंची. जा माफी माग आधी त्याची.”
माडीवर पडलेला तो तापानं फणफणत..बरळत होता “काहीबाही.. आई .. परीच झाल्या ग..का गेलीस तू तान्हं बाळ टाकून??
या लोकांना माझं जीवन टाकणं माझं मोल कधीच समजणार नाही ज्यांच्यासाठी मी नेहमीच हजर राहत पळापळ करतो..!!
आजींच्या ओटीत सुरक्षित वाटलं खरं .. पण आता वारे वेगळ्या दिशेने वाहू लागले.माणसं बदलली.”

नातू आला .. माफी मागितली तसा गणपा ताडकन उठून बसला.. कामाला लागला.. जणू अंगात वारं संचारलं की.
दहा हत्तींचं बळच की. मुळात कामाचा वाघच तो.

नातू यादी संपताना पहात होता.. हा राक्षस अजून
काम दे.नाहीतर तुला खाऊनच टाकतो;असं तर म्हणणार नाही ना.
कामाचा असा उरक.
आजोबांनी रत्नच सांभाळलं होतं की.

नाही बोलणार तुला टाकून पुन्हा कधी.
पण अंग काढून घेत जाऊ नको बाबा.
तू अंग झटकले न् मला अंगात कापरंच भरलं जणू.
कामाचा डोंगर उपसावा कसा !!

कार्यात पाहुणे जसजसे येऊ लागले तसे नातू नव्या सोयऱ्यांना पहिली ओळख करून देत होता ती
गणपाची..गणपाही डोईवरची टोपी नीट करत रामराम करत राहिलेला.

नातसून पहिल्या रात्री खोलीत जाताना बोलली.. हळूच ही चिठ्ठी पाठराखणीला आलेल्या बोटीला द्या .
तसा गणपा मनोमन हरखला‌.. त्याचं अढळ स्थान
आताही पक्कं राहणार होतं.. अजूनच.

या लोकांना हिला नवखी असूनही माझं मोल कळलं.. कदर करणारच ती.. ज्या नव्या मालकिणीसाठी तो नेहमी जीव टाकणार होता..!!

अग्रपूजेत असलेली सुपारी बाजूला हसत होती.
2 4 5 W O R D S

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

7 Comments

  1. दुरुस्ती.. टायपिंग मिस्टेक..

    बोटीला
    ऐवजी
    छोटीला

    आणि

    जीवन
    ऐवजी
    जीव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!