#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क(६/१०/२५)
सारंग आणि समिधा नवविवाहित जोडपं. दोघेही अनाथ असल्यामुळे मित्रमंडळीच्या साक्षीनेच लग्नाचे सोपस्कार पार पडले होते. दोघांनी मिळून घेतलेल्या त्यांच्या छोट्याशा घरट्यामध्ये हे राघू मैनेचं जोडपं आनंदाने राहत होतं.
लग्नाच्या वर्षभरानंतरच एक गुडन्यूज त्यांना कळली. सारंग आणि समिधा आई-बाबा होणार होते. पण इतक्यात त्यांना ही जबाबदारी नको होती. बाळंतपण आणि बाळाचं कसं करणार ह्या विवंनचनेत दोघे बसले होते. इतक्यात शेजारच्या राधा काकू समिधासाठी गाभूळलेल्या चिंचा घेऊन आल्या. त्यांनाही माहिती कळली होती आणि खूप आनंद झाला होता.
राधा काकू आणि रमेश काकांचा मुलगा रोहित अमेरिकेमध्येच सेटल झाला होता. त्याला एक छोटा मुलगाही होता. पण या दोघांना आपल्या नातवंडाचे लाड कधी पुरवताच आले नाही. ही खंत कायम त्यांच्या मनात सलत होती.
काकूंनी सारंग व समिधाच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. तिला प्रेमाने जवळ घेत त्या म्हणाल्या,”अगं तुझे आई-बाबा असताना तू का काळजी करतेस. आम्ही दोघं आहोत ना तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यायला. उलट आम्हालाही आजी आजोबांचं सुख उपभोगता येईल.”
हे ऐकताच दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांना आई-बाबा मिळाले होते. आणि काका काकूंना त्यांची मुले.
काही नात्यांना नाव नसते आणि काही नाती फक्त नावापुरती असतात.

खूप छान 👌👌
सुरेख लेखन
ремонт бойлеров на дому [url=https://www.fix-boiler-moskva.ru/]https://fix-boiler-moskva.ru/[/url]