# माझ्यातली मी #
*** लघुकथा लेखन टास्क ***
… नात्याला नाव देऊ नये हेच खरं…
धरणगावकर भाऊ हे मोठं प्रस्त. त्यांचा एक मोठा वाडा व शेतीवाडी. त्यामुळे कशालाच कमी नाही. सुसंस्कारित घराणं. मुलगी मधुरा अतिशय हुशार.
बारावीनंतर तिचा व तिची मैत्रिणी स्वाती दोघींचाही वैद्यकीय क्षेत्रात पाठोपाठच नंबर लागला पण जागा एकच. स्वातीची परिस्थिती गरिबीची. तिला परिस्थितीमुळे जाता येणार नाही हे मधुराला कळून चुकले होते. आपण जर तिच्यासाठी काही करू शकलो तर तिच्या आयुष्याचे सोनेच होईल. आपल्या ऐवजी तिचा प्रवेश झाला तर तिला नक्कीच फायदा होईल. आई-बाबांना काहीतरी कारण सांगूया….
आई बाबा,
मी आतापर्यंत तुमच्यापासून कधीच दूर गेले नाही. एकदम मोठ्या शहरात जायचे, मनात भीती नाही पण तेथील विद्यार्थ्यांची शान शौकी, सफाईदार भाषा मला खीजवेल का? माझ्यावर हसतील का? याचा मला ताण वाटतो.
ते म्हणाले बाळा,
पहिली पायरी ही सगळ्यांनाच जड जाते. सगळे व्यवस्थित होईल
रात्री झोपायला गेल्यावर तिला स्वातीचा फोन आला. मधुरा, माझे स्वप्न पैशाअभावी अधुरे राहणार. बाबांनी स्पष्टच नाही म्हणून सांगितले.
मधुरा म्हणाली,
तू काही काळजी करू नकोस,बघते मी. तिने आई-बाबांना सांगीतले,माझ्या ऐवजी आपण स्वातीचे पैसे भरून तिला प्रवेश मिळवून देऊया.
त्यांना हा निर्णय पटला नाही. तू फक्त स्वतःचा विचार कर.
खूप विचार करून मधुराने ठरवले आतापर्यंतच्या जमवलेल्या पैशात आपण स्वातीचे शिक्षण करूया. स्वातीने नाही नाही म्हटले तरी मधुराने ऐकले नाही व तिला प्रवेश मिळवून दिला.
ज्यावेळेस मधुराच्या आई-बाबांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी तू हे योग्य केले नाहीस. आमची स्वप्ने धुळीला मिळवलीस. आमच्यापेक्षा दूरच्या नात्याला महत्त्व दिलेस की ज्याला नावच नाही.
बाबा,
मनाने जोडलेल्या नात्याला नाव नसतं. त्याला नाव द्यायची गरजच नसते.
बाबा,
सुखदुःख ही सगळ्यांच्याच अंगणात असतात पण ती पार करण्यासाठी प्रेमाच्या नात्याचा पूल बांधावा लागतो. न बोलता ते आत गेले….
म्हणूनच म्हणतात,
“काही नात्यांना नाव नसते आणि काही नाती नावापूर्तीच असतात “…
…. शब्द संख्या… २६०…
… सौ अंजली आमलेकर…. ७/१०/२५

छान कथा