#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन
विषय …काही नात्यांना नाव नसते तर काही नावापुरते असतात
❤️❤️ ऋणानुबंध ❤️❤️
कल्याण सीएसटी सुपरफास्ट ट्रेन सारखी सुनीताही प्रत्येक कामात सुपरफास्ट ..नेहमीची सुपरफास्ट ट्रेन तिने आजही कल्याण वरून पकडली . नेहमीची ट्रेन म्हणून ट्रेन मधल्या अनोळखी बायका पण रोजच्याच, लगेच तिला बसायला जागा द्यायच्या , त्यांनी चक्क आज सुनीताच डोहाळजेवण ट्रेनमध्ये साजर केलं. किती खाऊ,भेटवस्तू,गाणी.एक तासाचा प्रवास संपू नये असं वाटत होत..ट्रेन मधली ओळख पण खरंच कुठले हे ऋणानुबंध .. सुनीता साडेआठ महिन्याची गरोदर होती..उद्यापासून चार महिने सुट्टी घेऊन डिलिव्हरीसाठी गावी माहेरी जाणार होती..आता चार महिने तरी आपली भेट होणार नाही असं बोलताना सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं .इतर बायकांच्या डोळ्यातही पाणी आले ,प्रत्येकीने तिला प्रेमाचे सल्ले देत शुभेच्छा दिल्या
त्यादिवशी दुपारीच ऑफिसमध्ये सुनीताला त्रास व्हायला लागला ,ऑफिसस्टाफने तिला जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेलं आणि जवळ ना सासरचे ,ना माहेरचे सुनीताची डिलिव्हरी झाली .. बाळ नववा महिना लागण्याच्या आधी झालं म्हणून कमी वजनाचं , त्यात सुनीताला दूधच येत नव्हतं,बाळ खूप रडत होत ..बाजूच्या कॉटवरची कोळीणबाईने तिच्या बाळानंतर सुनीताच बाळ कुशीत घेतलं ,आणि मनसोक्त दूध पाजलं.. त्या दुधाची किंमत अनमोल होती .सुनीताने अश्रूभरल्या नजरेने तिचे आभार मानले..
सुनीताची डिलिव्हरी झाली तेव्हा तिचा नवरा कामानिमित्त मुंबईच्या बाहेर होता , तो ही लवकर पोहचू शकत नव्हता .माहेरचे तर गावी .. ऑफिस जवळ राहणाऱ्या जवळच्या एका नातेवाईकांना तिच्या आईने फोन केला तर त्यांनी चक्क घरातील प्रत्येकजण आपल्याआपल्या कामात व्यस्त आहेत अशा सबबी सांगितल्या .. सुनीताचा भाऊ , नवरा दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मधे येईपर्यंत पूर्ण काळजी तिच्या ऑफिस मधल्या लोकांनी घेतली .कसले हे ऋणानुबंध.
हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा सुनीता म्हणाली खरोखरच काही नात्यांना नाव नसते तर काही नावापुरते असतात ह्याचा पूर्ण अनुभव मला ह्या दिवसात आला .
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या ..250


Good story
सुंदर कथा
सुंदर कथा👌👌
Sundar katha
खूप सुंदर कथा