#माझ्यातली मी
#लघुकथालेखन
@everyone
🌹शीर्षक –बाकावरची सावली 🌹
बागेतला जुना बाक वसंतरावांच्या आयुष्याची शांतता बनला होता. मनात मोकळी सावली,कारण नात्यांची व्याख्या फक्त नावापुरती उरली होती.
मग रिया तिथे खेळायला यायची, एक चिमुकलं चांदणं. खेळून झाल्यावर ती त्यांच्या बाकाजवळ थांबायची.
एक दिवस वसंतरावांनी विचारले, “बाळ, इथे येतेस, पण बोलत नाहीस. काय नाव तुझं?”
रिया: “बोलण्यापेक्षा, मला तुमच्याजवळ शांत वाटतं.”
रिया त्यांच्यासमोर बसायची. वसंतराव तिच्या निखळ हास्यात स्वतःचं बालपण पाहायचे.
रिया: “काका, तुम्ही नेहमी एकटे का बसता?”
वसंतराव: “मी एकटा नाही, तू आहेस ना माझी सोबत.”
रिया: “माझं नाव माहितीये तुम्हाला?”
वसंतराव: “माझ्यासाठी तू आनंद आहेस.”
रिया: “आणि तुम्ही कोण आहात माझ्यासाठी?”
वसंतरावांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. ते म्हणाले, “सावली. मी तुझ्यासाठी एक शांत सावली आहे, जिथे बंधन नाही, अपेक्षा नाही.”
त्यांच्या नात्यात ना नाव, ना रक्ताची ओळख. केवळ दोन शांत जीव, एकमेकांना हृदयाची ओढ देत होते.
रिया दूरदेशी जाणार होती. शेवटच्या दिवशी ती गळ्यात पडून रडली.
रिया: “आता कोण देणार मला ही शांत सावली?”
वसंतराव: (मायेने) “बाळे, काही नाती नावाविनाच खरी असतात, हृदयात जिवंत राहणारी. ज्यांना आपण नाव देतो, ती तर कधीकधी फक्त नावापुरतीच उरतात. हे नातं जपून ठेव.”
रिया दूर गेली. वसंतरावांना शांत बाकावर जाणीव झाली की, मुलांच्या ‘नावापुरत्या’ नात्यातून आलेली पोकळी, रियाच्या नाव नसलेल्या मायेने भरून निघाली होती. त्यांना अर्थपूर्ण आणि निस्वार्थ नातं मिळाल्याचं शांत समाधान होतं.
शब्द संख्या 200 ~अलका शिंदे


खूप सुंदर कथा
Khup sundar
Very nice
खुप सुंदर कथा
सुंदर 👌🏻📖✍🏻
सुंदर कथा