#माझ्यातली मी
#विकेंड टास्क लेखन
#रसग्रहण गाण्याचे
**गाणं मनातलं…..,
“तोच चंद्रमा नभात,,
तीचं चैत्र यामिनी,
एकांती मज समीप,
तीचं तूही कामिनी.”
बाबूजी सुधीर फडके यांनी स्वर बद्ध, आणि संगीत बद्ध केलेलं.. हे गीत. आजही रसिक मनाचं आवडत गाणं.
रात्रीच्या निरव शांततेत ऐकताना मन कसं भूतकाळात
नकळता जात. शांता बाईशेळकेचं भावगीत.
पण ह्या ही गीताला एक इतिहास आहे. बाईंना ह्या गीताची
कल्पना एका संस्कृत शोल्का तून सुचली.
मूळ संस्कृत श्लोक काव्यप्रकाश या अलंकार शास्त्रा वरील
ग्रंथात उदाहरन म्हणून वापरलेला.
श्लोक —
य :कौमारहर :सं एव ही वरस्ताएव चैत्र क्षपास्ते
चोन्मलीत मालती सुरभय :प्रौढा :कदम्बनिता :
सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापार निलविधी
रेवरोधसी वेतस्तीतरुतले चेत समूतकंटते.
अर्थ –
नायिका सखीला सांगते माझे कौमार्य हरणं करणारा
प्रियकर तोच आहे आजही तशीच चैत्राची रात्रं आहे फुललेल्या
मालिनी पुष्पानी सुवासित झालेले कदंब वृक्षा वरून येणारे वारे ही तसेच मीही तीचं तरीही या रेवा काठी त्या क्रिडेच्या
कल्पनेने चित्त उत्कंठीत होतं आहे.
खरं तर हा श्लोक 7/8व्या शतकात कोणी एक शिला –
भट्टरिका नावाच्या आज्ञात कवयत्रीचा शारंगधर पद्धतीत
एका जुन्या सुभाषित संग्रहमध्ये तिच्या नावाने दाखवलेला.
कल्पना जरी या श्लोकातून तरी विरोधाभास आहे
तिथे नायिका चेत :समुतकंठते असे सांगते तर या गीतात नायक गीत न ये जुळून भंगल्या सुरातूनी असे खेदाने
म्हणत आहे.
असो हा झाला इतिहास पण खरं वास्तव्य असचं आहे न.
ती पहिल्या प्रीतीची ओढ कालंतराने तशीच राहते असं नाही.
संसाराच्या व्यापात हे सारं मगमागे पडत. वयाचाही परिणाम असतोच.पण सांगू, वय आणि मन यात मनानं कायम तसंच असायला हवं जोडीदाराला त्यात तीचं ओढ वाटायला हवी.मन आनंदी समाधानी असेल तर निरसता येणारं नाही.
खरं ना. समर्पण मनापासून हवं. मनाला वयाच बंधन नसतं.
निरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे,
छायानी रेखीयले चित्र तेच देखणे.
जाईचा कुंज तोच तीचं गंध मोहिनी,
एकांती मज समीप तू ही तीचं कामिनी.
सारे जरी तसेच धुंदी आज ती कुठे
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी, एकांती –
त्या पहिल्या भेटीच्या आज लोपल्या खुणा,
वाळल्या पानात गंध शोधतो पुन्हां,
गीत ये नसे जुळून भंगल्या सुरातुनी,एकांती —
माझं व माझ्यlmr चं हे अतिशय आवडत गीत आज ते
नाहीतमाझ्या सोबत पण त्या स्मृती आहेत तशाच मनामधी.
अंजली मुरडिओ.


खूप सुंदर
👍🏿👍🏿
सुरेख