🌸उदे ग अंबे उदे 🌸
नवरात्र उत्सव चालूआहे.. सगळीकडे स्त्रियांचा उत्साह ओसंडून वहात आहे… समस्त स्त्रीवर्ग चैतन्याने भारावून गेला आहे… प्रत्येक स्त्री आपापल्या परीने देवीची उपासना, आराधना करत आहे.प्रत्येक स्त्रीला दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या संघर्षाला तोंड द्यावेच लागते. कधी अष्टभूजा व्हावे लागते, तर कधी सरस्वती, अन्नपूर्णा,तर कधी दुर्गेचे रौद्ररुप धारण करुन तिला आपले सामर्थ्य सिध्द करावेच लागते..अगदी कुमारी अवस्थेपासून ते वृध्दावस्थेपर्यंत तिला शारीरिक, मानसिक ताकदीने उभे राहावेच लागते.काळ बदललाय… कोणत्याही वेळी कशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते, आणि अशावेळी,
स्त्री ला सर्व शक्तीनीशी, परिस्थीतीला सामोरे जावेच लागते.. यासाठी, परिश्रम, प्रतिकार, सहनशीलता, ध्येयपूर्ती,हे दैवी गुण आपल्यामधे संक्रमित करण्यासाठी स्त्रीया आदिमायेची उपासना करत आहेत…..समाज कितीही शिकला,सवरला,,पुढारला ,तरी,जगात वावरताना,
तिला सदैव आत्मभान जागृत ठेवावे लागते… प्रसंगी धैर्याने लढावे लागते,तरच तिचा निभाव लागू शकतो…ती सन्मानाने जगू शकते… समाजातील दृश्य,अदृश्य राक्षसांचा नि:पात करण्यासाठी तिला ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आदिमायेचा जागर करायलाच हवा…..
उदे ग अंबे उदे….🙏
उदे ग अंबे उदे…..🙏
धन्यवाद 🙏
प्रतिभा कुलकर्णी
