# माझ्यातली मी
#कथा लेखन टास्क
हिरवे स्वप्न
कमल,ऐ कमल…अग कुठे आहेस …केव्हापासून आवाज देत आहे.. इति मोहन
एक साधा सरळ मेहनती शेतकरी ….गरीब नाही बर ..लाखोचा पोशिंदा गरीब कसा असणार.
आज काही कर्जा सबंधीची कामे जिल्हा बँकेतुन आटोपून घरी आला होता… आल्या आल्या आनंदाने आपली पत्नी कमल ला आवाज दिला ….हाक ऐकताच पदराला हात पुसत ती बाहेर आली.
किती त्या हाका…कणिक लावत होते आलेच होते चला गरम पोळ्या करते जेवायला या.
अग अग कशाला आवाज दिला ते तर बघ
अस म्हणत त्याने तिच्या हातात एक सुंदर पार्सल ठेवल.
आनंद आणि आश्चर्य असे संमिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर वर उमटले…उत्सुकतेने पार्सल उघडले ….अन बघतच राहिली अन बघता बघता डोळयात अश्रू दाटून आले….इतका सुदंर हिरवागार रंग ती प्रथमच पाहत होती. …ती होती एक सुदंर बुटटेदार हिरवीगार पैठणी तिच्या स्वप्नांतली .
वाह किती सुंदर …आपल्या मयुरी ला खुप छान दिसेल हा रंग
. .. मयुरी त्यांची एकुलती एक हुशार कन्या.. आता बाविसची झाली होती…यावर्षी कपाशीचे पिक जोमात वाढले होते … तसा सोयाबीन ने थोडा धोका दिला होता पण हिरव्यागार वाढलेल्या पऱ्हाटीच्या भरवश्यावर मयुरी साठी वर संशोधन सुरु केले होते. ..दिसायला देखणी, हुशार सहज योग्य मुलगा मिळताच घरात मगंलकार्य होणार
होते.
अग अग मयुरी साठी नव्हे तर तुझ्या साठी आणली आहे… आज जिल्हा बँकेच्या बाजुच्या हॉलमध्ये एक प्रदर्शन सुरु होते वेळ होता सहज डोकावलो …तर सगळी कडे सर्व महिला अन साडयाच साडया…तसाच परत फिरत असता एका सुदंर पुतळयाला नेसवलेली हिरवीगार पैठणी नजरेत भरली नी तुझीच आठवण आली .
आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ..तुला विचारले असता तू तुझी इच्छा सांगितली होती ….पण मी तेव्हा परिस्थिती मुळे पुर्ण करु शकलो नाही. आज पैठणी पाहता सारे आठवले ..अन खरेदीचा मोह आवरता नाही आला..विचार केला मयुरी च्या लग्नात तुला छान शोभुन दिसेल.
मयुरी ला तर घेवूच की पण तेव्हा लगीनघाईत नवरीची आईच मागे पडायला नको …म्हटल आजच घेवून टाकु.
ओलावल्या डोळयांनी अन भरल्या आवाजाने ती बोलली…कशाला एवढा खरच केला आहेत कामापुरत्या साडया माझ्या कडे
अग पण राणी माझे हिरवे स्वप्न अधूरेच राहिले असते नं
चला जेवायला वाढते …साडीने पोट भरणार आहे का? असे म्हणत ती स्वयंपाक घराकडे वळली.
हसत खेळत दोघांची जेवण होऊन शांत झोपी गेली….सर्व सुरळीत चालु देईल ती नियती कुठली…बाहेर अचानक काळयाशार मेघांची गर्दी झाली… विजा कडकडायला लागल्या बघता बघता मुसळधार पाउस कोसळायला सुरवात झाली. इतका पाऊस जणू ढगफुटी च असावी.
काय करणार देव जाणे हा अवकाळी राक्षस…विचार करतच तै दोन जीव निद्रादेवी च्या कुशीत शिरले. इकडे वरुणराजा आपली मनमानी करीतच होता.
मोहनराव.. अहो मोहनराव .काय काळझोप लागली म्हणायची ….दारावर थापावर थापा पडत होत्या. आवाजाने जागी होऊन मोहन ने दार उघडले.
समोर पाहतो तर काय त्याच्या शेताबाजूचे शेतकरी सारे गोळा झाले होते.
अस झाल तरी काय ?
कुणीही उत्तर न देता त्याचा हात पकडून शेताकडे चालायला लागले. पाठोपाठ सावरुन ती पण निघाली. शेताकडे
ा पोहचताच समोरच दृश्य पाहून त्या उभयतांना ब्रम्हांड आठवल . मटकन खाली बसत टाहोच फोडला. …कारणच तसे होते त्यांच्या अर्धा अधिक शेतातील पाच फुट वाढलेली, बोडयांनी लगडलेली पऱ्हाटी म्हणजे कापसाचे पिक नुसते वाहून गेले नव्हते तर काळी आई पण वाहून जाऊन बारा ते पधंरा फूट खडडा जमिनीवर पडला होता.
कसे घडले हे अचानक सर्व?
अलकावती नदीउन्हाळ्या त गावालगतच वाहत होती…. जीवनदायीनी होती ती…उन्हाळ्यात तिच्या च पाण्यावर पिके येत होती पण आज अशी का कोपली ?
निसर्गाची नव्हे तर मानवाची चुक होती. तिच्या वर बंधारा घालण्याची मागणी कित्येक वर्षापासून सरकार दरबारी धूळखात पडली होती. एक लहानसा पुल तात्पुरता बाधुंन दिल्या गेला….मुसळधार पावसामुळे आजूबाजूचे नदी,नाले अलकावती ला येऊन मिळाले…परिणाम असा ती प्रचंड वेगाने निघाली छोटासा पुल केव्हाच उन्मळून पडला
अन वेगाने ती मोहनच्या शेतातून पुढे धावली. तिच्या वेगापुढे काळी आई तग धरु शकली नाही. जीवन दायीनी माता आज जीवघेणी ठरली होती.
निसर्गाचा हा प्रकोप ते उभयता हतबल होऊन पाहत होते…एक वेळ पिक वाहून गेले असते ..पुढल्या वर्षी पुन्हा पेरलेच असते पण पण काळया आईला कोणत्या बाजारातून विकत आणणार ..विचारशक्ती च जणू नष्ट झाली होती .एका रात्री तून मोहनचे
‘ हिरवे। स्वप्न ‘ भंग पावले होते.
मशागत करुनी सेवा काळयाआईची केली
भविष्याची स्वप्ने पाहत जोमात पेरणी केली
चुक मानवाची होती ,अशात निसर्ग कोपला
रात्रीत अवघ्या हिरव्या स्वप्नांची माती झाली
😔 विनया देशमुख 😔

कृपया वाचून अभिप्राय द्या
सुंदर 👌👌
खूप छान वास्तविकता लिहिलीत ताई
खूप छान.