माझ्यातली मी –
कथा लेखन टास्क

उदेग अंबे उदे

सकाळीच सगळी कामं उरकून तिने देवीला जायचं ठरवलं . चालत अनवाणी जाऊन तिला १०८ प्रदक्षिणा घालायच्या होत्या . तसं बरंच अंतर होतं .परत ७५० पायऱ्याची चढण चढायची .पण मनापासून श्रध्देने
करायचे ठरवले . अखेर मंदीरात पोहोचली दर्शन झाले खूप प्रसन्न वाटले मनाला . देवीनं हिरवी भरजरीसाडी नेसली होती . अवती भोवती पण बहुतेक सर्व
स्त्रीयांनी आज खास हिरवा रंग परिधान केला होता . हे सारे हिरवाईचे वातावरण पाहून ती मनोमन सुखावली . पणआपल्याला मात्र अशी साडी नेसता आली नाही ह्याचे मनोमन तिला दुःख झाले कसेतरी मोलमजूरी करून पोट भरत होती . नवरा तर नावालाच धनी कुंकवाचा होता . जे कांही मिळवायचं ते पिण्यात घालवायचं हा त्याचा रोजचाच धंदा होता उलट कमी पडलेतर बायकोलाच मारहाण करून तिचे पैसेही घ्यायचा . आज ती मनोमनखूप दुखावली पण कांहीही बोलली नाही फक्त नकळत दोन अश्रू डोळ्यातूनदेवी पुढे ओघळले .ल गेच पुसून ती निघणार इतक्यात एका बाइने तिला कुंकू लाऊन तिची खणा नारळानं ओटी भरली तिला हिरव्या बांगड्या गजरा दिला . एवढयानेच ती खूश झाली . खूप दमून गेली होती पायऱ्या उतरून चालू लागली . अजून बरेच अंतर चालत जायचे होते पायाला खडे टोचत होते . रस्ता पार करणे अवघड झाले . पण थोडा रस्ता पार करताच समोरची ती गर्द हिरवाई दुतर्फा हिरवी हिरवी झाडे पाहून तिला हायसे वाटले खाली हिरवळीवर चालताना जणू देवीनंआपल्यासाठी गालीच्याच टाकला आहे असे तिला जाणवले चालताना तिचा शिणवटा कमी झाला थोडी पुढे गेली तिथे हिरवळीवर एक बाक होता . त्यावर ती स्थिरावली आणखी छान वाटले .आज कांहीतरी वेगळेच संकेत येत असल्याचे तिला जाणवले .थोडी विश्रांती घेतल्या नंतर परत घराकडे निघाली . घरी पोहोचली घराचा दरवाजा उघडाच होता . बहुतेक नवरा पिऊन पडला असेल असे तिला वाटले . पण घरात पाऊल पडताच नवऱ्याने तिला मी आत्ता तुळजापुरला जाऊन आलो आणि तिचा हा प्रसाद तुझ्या साठी आणला आहे ही तिची हिरवी साडी आज मी माझ्या घरातल्या या देवीला देणार आहे . ही घे . आणि मी देवीसमोर शपथ घेतली आहे मी कधीच यापुढे पिणार नाही . असे एकावर एक सुखद धक्के तिला आज मिळत होते ती मनातून आनंदातउचंबळून नहात होती . तिनेही प्रसन्न मनाने ती साडी घरात देवी पुढे ठेवली आणि नेसली . सकाळी सर्व स्त्रीयांनी हिरव्या साड्या नेसल्या तेव्हां ती दुखावली होती . आता तिलाही भरजरी हिरवी साडी मिळाली तीही तिच्या नवऱ्याकडून . तिने प्रसन्न मनाने देवीला नैवेद्य दाखवला तिची आरती केली आणि मनोभावे प्रार्थना करून म्हणाली
उदे ग अंबे उदे .

उषा पाटोदकर .

2 Comments

  1. मनाला स्पर्श करून गेलं कथानक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!