#माझ्यातलीमी
#कथालेखन
२७/९/२५
**”ती खूप काही करते “**
हिरव्या पाना पानाशी
चमकती दवबिंदू मोती
अवनी सजली नटली
कळ्यांची रंगीत कांती
बस मधून खिडकीतून प्रीती बाहेरच ते रमणीय दृश्य बघून वरील ओळी गुणगुणत होती .खूप छान ,हिरवगार ,प्रसन्न वाटत होत तिला..प्रीती,दीपक दोघे हनीमूनला फिरायला दार्जिलिंगला आलेले ..
प्रीती तिच्या नावाप्रमाणेच सर्वांना प्रिय,
शाळेपासूनच तिची हुशारी सगळ्यांच्याच लक्षात आलेली. नेहमी आईला म्हणायची मला वेगळं काहीतरी करायचं आहे, आईला पण जाणवायचं आपलं हे लेकरू मोठं होऊन खूप नाव कमावणार आहे.
शालेय शिक्षण संपून, तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत पहिली येऊन ही आर्ट्स शाखेकडे वळून मराठी विषय घेऊन MA झाली..लिखाणाची प्रचंड आवड ..खूप छान कविता करायची आणि कथा लिहायची ..तिला त्याच क्षेत्रात करिअर करायचं होत ..
त्याप्रमाणे तिला संधीही मिळाली.
एकीकडे तिचे काम सुरू असता आई-वडील लग्नाचेही बघत होते. दीपक साने ओळखीतून अनुरूप स्थळ कळले,दीपक आयटी इंजिनियर ,दोघांची एकमेकांना पसंती झाली आणि लवकरच चतुर्भुज झाले. आणि हनिमून साठी फिरायला निघाले ..
हनिमूनहून परतल्यावर , खूप प्रसन्न , ताजी टवटवीत होऊन नव्या उत्साहाने दोघेही आपल्या आपल्या कामाला लागले ..
प्रीती घरीच बसून तिचं लिखाणाचं काम करायची,सतत लिहायची एकतर पेपर वर नाहीतर लॅपटॉप वर टायपिंग चालू असायचं तीच ….आणि दीपक तर आयटी क्षेत्रात त्यामुळे घराची एक रूम च त्याच ऑफिस होत..
प्रीतीला थोडीशी बागकामाची आवड होती, सवड मिळेल तेव्हा फुल झाडांची रोपे आणून नवीन प्रयोग करायची. स्वयंपाकातही निरनिराळे पदार्थ करून बघण्याची पण आवड होती. तिच्या कामातून वेळ मिळेल तसं ती सगळं जुळवून आणायची.
इतरांसारखी ती सकाळी लवकर आवरून नोकरीवर जाते आहे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत काम संपवून घरी येते आहे असे दृश्य नव्हते त्यांच्या संसारात….. ती आणि दीपक असे दोघेच त्यांच्या घरात. पण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने,अचूक नियोजन करून त्या दोघांची कामे घरातच
संगणकावर काम, त्यासंबंधी थोडे वाचन, थोडा अभ्यास , लिखाण असा त्यांचा दिवस सरून जायचा.
शेजारी पाजारी ह्यांची कानावर कुजबुज यायची कधीतरी
” काय बाई तो तर तो ती पण घरातच असते फार तर कुंड्यांमध्ये रोपे लावून लुडबुड करत असते, दिवसभर तर घरातच असते काय माहिती काय करते. ”
ते ज्या संकुलात राहायला आले होते तिथे ते नवखेच होते. दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आणि दोघांनाही वायफळ बडबड करण्याची आवडह नव्हती , त्यामुळे आपण भल आणि आपलं काम भल,हा दोघांचा स्वभाव ..
ती नक्की काय करते हे ही आजूबाजूच्या लोकांना माहिती नव्हते..
तिच्याकडे कामाला येणाऱ्य बाईकडून शेजारी पाजारी बातम्या काढून गॉसिप करायच्या , कारण त्या कामवाल्या मावशींचा रिपोर्ट ,”अवो त्या वैनी दिवसभर लिहित असतात, नाहीतर ते कॉम्प्युटरवर काहीतरी काम करतात, त्यांना माझ्याशी सुदीक बोलायला वेळ नाही ”
” जरा शिष्टच आहे ,कोणाशी बोलायला नको काय माहिती दिवसभरात घरात काय लिहित असते, आणि काय माहिती “ती नक्की काय करते ”
“असे कधीतरी जाता येता कानावर पडायचे.
दोन-चार दिवसांनी वर्तमानपत्रात, टेलिव्हिजन वर प्रितीचे नाव व तिने मराठी साहित्य क्षेत्रात केलेल्या लिखाणावर सगळी बातमी छापून आली. अनेक हिंदी ,मराठी सीरिअल्स, पिक्चर्सच्या स्टोरी तिने लिहिल्या होत्या ..तसेच सोशल मीडिया वर तिने सुरू केलेल्या क्वीन ऑफ स्टोरी ह्या चॅनेल ला हजारो लाईक, सबस्क्राईब मिळाले होते . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये ही तिने कार्य केले होते ..त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने तिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्याचे ठरवले आणि ही बातमी सर्वत्र पसरली ..दीपक ला तिचा सार्थ अभिमान होता ..
आणि प्रीतीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला
मीडिया वाले बातमी कव्हर करायला प्रीती च्या घरी आले , तेव्हा तीच अभिनंदन करायला अनेक सेलिब्रिटी ही आले होते.. तेव्हा सर्वांना चहा पाणी देताना कामवाल्या मावशींनी सांगितलं की ,”अवो त्या वैनी दिवसभर लिहित असतात वहीवर नाहीतर ते कॉम्प्युटरवर काहीतरी काम करतात, त्यांना माझ्याशी सुदीक बोलायला वेळ नसायचा , मले माहीत नव्हतं की त्या वैनी सीरियल,पिक्चर ला स्टोरी लिहितात, मले जर एखाद काम दिलं सीरियल मधे तर आवडेल करायला ..”
तेव्हा सर्व हसायला लागले ..प्रीती हसून त्या मावशींना म्हणाली पण आजपासून ठरवलं रोज अर्धा तास तरी बिल्डिंग च्या खाली असलेल्या हिरव्यागार गार्डन मध्ये फेरफटका मारणार ,तेव्हा कदाचित गॉसिप जास्त कानावर पडलं तर स्टोरी अजून सुचतील ..आणि हो आता कळलं ना तुम्हाला की “ती नक्की काय करायची ? पण तुमची ती एक लाइन माझ्या कानावर पडली आणि मला त्यावरून ती स्टोरी सुचली ,जी सुपरहिट झाली.. “ती खूप काही करते”.. माझ्या त्या स्टोरी ची नायिका आजी आहे , जी कोंड्या चा मांडा करून संसार चालवते ,गरिबीत स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ,आपली चार मुलं उच्चशिक्षित होतील ह्याची काळजी घेते, पण आधी नवरा मग मुल ,त्यानंतर सुना आणि मग नातवंडे ही तिला हेच ऐकवायचे की तुला काय कळतं? तू कुठे जग बघितलं आहेस का ? तू घरात बसून काय करतेस ? आजीला खूप वाईट वाटायचं , आयुष्यभर तिने तिच्या घरकुलाची सेवा केली त्याच काहीच मोल नाही का ? हो घरकुलाची सेवा , जी गृहिणी प्रत्येक स्त्री करते . आजीच्या नातीच लग्न नातीच्या पसंतीच्या मुलाशी होत,ज्याला आजीचा विरोध असतो कारण आजीला तो मुलगा गोडबोल्या ,आतल्या गाठीचा वाटतो पण तिचं कोण ऐकणार ,आजीच्या इच्छा असते त्या मुलाशी लग्न करायला नात नकार देते कारण शेवटी आजीला काय कळतं? शेवटी तेच होत , लग्नानंतर नातीला त्या मुलाचे खरे रंग कळतात , तिचा घटस्फोट होतो , नात नैराश्यात जावू नये म्हणून आजी पूर्ण प्रयत्न करते आणि तीच पुन्हा लग्न आजीला आवडलेल्या त्याच मुलाशी लावून देते .तेव्हा पूर्ण घराला कळत की आजी काय करते,आजी खूप काही करते..”
प्रीती पुढे तिच्या इंटरव्ह्यू मधे म्हणाली ,” आम्ही सीरियल, चित्रपट स्टोरी मधे खलनायक ,खलनायिका दाखवतो पण शेवट नेहमी हाच करतो की विजय हा शेवटी सत्याचा होतो ..आणि सीरियल ह्या नायिका प्रधान असतात कारण स्त्रीचा आदर हा घराघरात व्हायलाच पाहिजे हा त्या मागचा हेतू असतो ..
आता नवरात्र चालू आहे , नवरात्रात स्त्रीशक्ती , स्त्रीत्वाचा जागर होतो ..प्रत्येक स्त्री ही नवदुर्गेच रूप असते आणि ती खूप काही करते ..नारीशक्तीचा कायम विजय असो .. ”
सौ स्वाती येवले


खूपच सुंदर
चित्र अप्रतीम
सुंदर कथा
चांगली कथा
खूप सुंदर रेखाटन