#माझ्यातलीमी
#अलकलेखन ( १७.९.२५ )
दिलेले वाक्य – मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही
खूप वर्षांनी बाळ झालं होतं त्यांना..पण दैवाचा घाला आणि ते सैरभैर..
ती रोज हट्ट करायची, एखादं मूल दत्तक घेण्यासाठी…पण त्याचा साफ नकार..! स्वतःला कामात व्यस्त करून घेतले त्याने सारे विसरण्यासाठी..!
आज तिच्या हातात बाहुली आणि डोळ्यांत अनोळखी झाक…!
तो हताश..खरंच, मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही ग…!
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

सुरेख
खुप छान
सुरेख
So touchy
खूप छान अलक
खूप हृदयस्पर्शी अलक 👌👌❤️
सुंदर 👌🏻
खुप सुंदर 👌👌
हृदयस्पर्शी