#माझ्यातली मी
#अलक लेखन टास्क दि १७/९/२०२५
@everyone
#”मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही” यावर अलक
अनपेक्षित निर्णय
लग्नाला काही दिवस उरले असताना,त्याचा अपघात झाला आणि त्याचा पाय निकामी झाला. “पाय गेल्यामुळे लग्न मोडलं,” अशी कुजबुज सगळीकडे सुरू झाली. त्याच्या घरच्यांनीही तेच जाहीर केलं, पण प्रियाला कोणीच काही विचारलं नाही. “कोणी माझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही,” या विचाराने तिला खूप वेदना झाल्या. पण ती रात्रंदिवस त्याच्या सेवेत होती.
एक दिवस तिने सगळ्यांना ठामपणे सांगितलं, “मला त्याच्याशी लग्न करायचंय, पायाशी नाही!”
~अलका शिंदे


मस्त