#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#अलकलेखन ( १७/९/२५)
@everyone
खाली दिलेल्या वाक्याचा वापर करून अलक
“मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही”
…..स्वाभिमानी….
अग्निपरीक्षा दिल्यानंतरही जनभावनेसाठी तिला
तिची शुद्धता सिद्ध करण्यासाठी सांगितले जाते .
तेव्हा स्वाभिमानी ती पृथ्वी मातेकडे प्रार्थना करते व पृथ्वीत नाहीशी होते .
संपूर्ण प्रजेचा विचार करणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तमलाही वाटले असेल तिला सांगावेसे, “मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही”.
सौ स्वाती येवले


खुप छान अलक
खूप छान 👌🏻