#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क (१५/९/२५)
#लघुकथा
#साधे_रहाणीमान
❤️ साधे रहाणीमान ❤️
दिलेले वाक्य : “सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडतील ..”
————————————————–
वैष्णवी आणि प्रियंका दोघी अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी.. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांची दोन दिवसीय सहल एका पर्यटन स्थळी गेलेली. दुसऱ्या दिवशी जंगल सफरीला जाणार होते. वैष्णवीची तब्येत मधेच बिघडली आणि ती लॉज वरच थांबली.
सगळ्या जंगल सफरीला निघाल्या.. आणि स्त्री स्वभावाप्रमाणे वैष्णवी बद्दल सगळ्या गपशप करू लागल्या.
“बरं झालं वैष्णवी आजारी पाडल्यामुळे येऊ शकली नाही. नाहीतरी ती आपल्यात ऑड मॅन आऊट च आहे.. अगदी काकूबाई ..”
असाच सगळ्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. प्रियंका फक्त ऐकून घेत होती. पण आता तिची सहनशीलता आपली. ती बोलू लागली ..
“काय ग..?? कश्या मैत्रिणी तुम्ही.. ती साधी रहाते म्हणून काय काकूबाई झाली का ..??”
“नाहीतर काय ..!? काकूबाईच आहे ती .. काय तिचे कपडे .. काय तिचे केस .. !?” काही जणी तिच्यावर हसत कुत्सितपणे बोलू लागल्या.
“खरं तर आपण तिच्याकडून शिकायला हवं.. तिचं रहाणीमान साधं असलं तरी आपल्यात ती सगळ्यात जास्त हुशार, प्रामाणिक आणि सहनशील आहे. ती अंगभर कपडे घालते याचा अर्थ तिचे कपडे आपल्यापेक्षा अधिक चांगले आहेत. केसांना तेल लावून व्यवस्थित विचारून वेणी घालत असल्याने तिची बुद्धी तल्लख आहे. तिच्या सध्या राहण्यामुळे कुणी मुलं कधी तिची छेड काढत नाही हे तर आपण पदोपदी बघतोच ना! ती सोबत असली की मला तरी सुरक्षित वाटतं.. तुमचं मला माहित नाही.. ”
“हे मात्र खरं आहे .. मलाही तिच्यासोबत सुरक्षित वाटतं. ती सोबत असेल तर कुणा मुलांची आपल्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिम्मत होत नाही ..” दोघी, तिघी बोलल्या
प्रियंका मुळे सगळ्यांना वैष्णवीच्या साधेपणाने राहण्याचं कौतुक वाटलं. आणि त्यांनीही एकमताने ठरवलं की आपणही तिच्यासारखं राहायला हवं.
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (१५/९/२५)


छान कथा.
Thank you
सुंदर…. च👌👌
Thank you
साधी रहाणी ,उच्च विचारसरणी… खूप छान
खूप छान कथा 👌👌👌
सुरेख कथानक
धन्यवाद सखी
धन्यवाद ताई
Thank you
Very nice
Thanks