……. सार्थ मैत्री…….

# माझ्यातली मी #
*** लघुकथा लेखन टास्क ***
” सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडतील ” या वाक्याच्या आधारे एक लघुकथा…..
………….. सार्थ मैत्री…………..
माधव व माधवीच्या घराचे काम करायचे होते. पण वेळ अशी होती की ते त्यावेळेस तिथे हजर राहू शकत नव्हते. कारण माधवच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांच्या माळ्यावर एक भाडेकरू राहायचे. एक छोटसं कुटुंब.

माधवी म्हणाली माधव, काय करायचं रे आता. आपल्याला तर आईची तब्येत बरी नसल्यामुळे गावाला जायचेच आहे. नंतर काढायचे का काम? पण माधव म्हणाला….. आता ठरवले ना तर आताच करायचे. आपले भाडेकरू आदित्य व आश्लेषा खूपच मेहनती व विश्वासू आहेत. त्यांना सांगून आपण हे काम पूर्ण करायचे. कंत्राटदाराला व आदित्यला पूर्ण माहिती देऊन ते गावाला गेले.

घराचं काम मोठं जबाबदारीचं होतं. ते आदित्य व आश्लेषाने अगदी काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. अर्धे काम सुरू असतानाच आश्लेषाची तब्येत बिघडली. पण आदित्यने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या आईला बोलावून घेतले. तो म्हणाला…..
आश्लेषा, माधवचा आपल्यावर कितीतरी विश्वास आहे गं. त्याचं ते काम अर्धवट टाकून नाही चालणार. मी तुझ्याकडेही लक्ष देत जाईल व या कामाकडेही. कारण माधवने आपल्याला गरजेच्या वेळी बरोबरीने मदत करून आपलं चांगलं होण्याचीच अपेक्षा केली आहे. असा मित्र वा असे घर मालक मिळणे हेच नशिबाचे सूत्र आहे. माणुसकीच मोल हे पैशापेक्षा विश्वासावर चालतं ग.

माधवी म्हणाली हो रे, तू माझी काळजी करू नकोस आई आहे माझ्याजवळ आणि तुझ्या चक्रा तर वर होणारच. बिनधास्त तू कामावर लक्ष दे. त्याचे ऑफिस काम घरून असल्यामुळे त्याने त्याचे ऑफिस काम, आश्लेषाची तब्येत व माधवचं घर यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून घर पूर्ण झाल्यावर त्या घराचा फोटो माधवला पाठवला. माधवने व्हिडिओ कॉल करून त्याला खूप खूप धन्यवाद दिले. डोळ्यात अश्रू मावेना. एवढा मोठा विश्वास आपण त्याच्यावर टाकला व त्याने विश्वासाचे सोने केले. म्हणूनच म्हणतात सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडतील…..
….. शब्द संख्या.. २५४…..
…… अंजली आमलेकर….. १५/९/२५

8 Comments

  1. खुप छान .. मस्तच … असे विश्वासू भाडेकरू मिळणं नशीबच ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!