मितेश आर्याच्या सहवासात सुखावत होता.दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रेमाचा रादर एका मुलीचा इतका जवळचा सहवास त्याला लाभला होता जुई नंतर कोणत्याच मुली शी त्याने कसलाच संबध ठेवला नव्हता.
पण आर्या अपवाद ठरली होती.ती नुसता उत्साहाचा झराच होती जणू.गोड बडबडी ,प्रत्येक क्षण भरभरून जगणारी.सो त्याच मन तिच्या कडे झुकू लागले.आर्या अचानक म्हणाली, ” अहो रायटर केव्हा पासून मीच बडबड करत आहे.तुम्ही काहीच बोलत नाही
तसे काही नाही तुम्ही बोलत आहात म्हणून मी ऐकत आहे.मितेश म्हणाला.
बघा ना इतकी रम्य संध्याकाळ आहे तुमची एक शायरी व्हायलाच हवी.प्लीज.आर्या त्याच्या कडे बघून हसत म्हणाली.
ओके,सूनिये मॅडम अर्ज किया हैं…” ये शाम सुहानी, तन्हा सा ये आलम उसपर मौसम ने ये सितम कर दिया!!
तेरी नशिली आँखो ने कब का मुझे बेहोश कर दिया.!”
वाह वाह क्या बात ,खूपच सुंदर आर्या म्हणाली.
“तेरे आँखो के ख्वाब यू तू बिखरने ना दे..
कूछ ये हसीन लम्हे आज हाथो मे सिमटने दे.. देखकर इंन्हें जी लेंगे हम,, मरने की अब ना तू इजाजत दे…!!..अजून एक शायरी त्याने बोलली.
सुपर्ब..आर्या ने ग्रिट केले.
रंकाळयाचा पूर्ण मोठा राऊंड फिरून ते आले.निखिल त्यांच्या अगोदरच येवून थांबला होता. बोटी तून उतरताना मितेश ने आपला हात आर्या समोर केला ,त्याचा हात पकडुन ती बाहेर आली.तिचा हात असाच कायम आपल्या हातात असावा अस त्याला वाटून गेले.
आर्या म्हणाली,आपण भेळ खावूया का? मस्त भेळ मिळते इथे.
हो चालेल ..मितेश म्हणाला.त्याला तिच्या सोबत जितका वेळ घालवता येईल तितका घालवायचा होता.निखिल ला ते कधीच समजले होते .तिघांनी तिथे भेळ खाल्ली.मग ते आईसक्रीम खात उभे होते.” मी मघाचे फोटो सेंड करते तुमचा नंबर द्या आर्या मितेश ला म्हणाली. त्याने मग नंबर दिला. तशी आर्या म्हणाली,मी फोटो व्हॉट्स ऍप करेन रायटर.
ओके पण तुम्ही मला हे सारख सारखं रायटर नका म्हणू प्लीज.से मि मितेश ओन्ली.
ओके मितेश अँड यू आल्सो से मि आर्या.
येस डन हसत मितेश म्हणाला.
बाय द वे मितेश तू पुण्याला कधी परत जात आहेस?
मी परवा जाणार आहे पुण्याला,उद्या एक दिवस आहे इथे.
ओके पण आज ची संध्याकाळ खूप छान गेली ना.,खूप मजा आली.
हम्म्म सेम हियर..
आर्या निखिल शी बोललीच नव्हती म्हणून मग तिने त्याला विचारले, ” निखिल तू काय करतोस?
मी इंजिनियर आहे आणि जॉब करतो.
नाईस ..तू इथेच असतोस का?
हो,मी पुण्याला शिकायला होतो मितेश सोबत.मी इंजिनियर झालो,पण मितेश ला लिखाणाची ,वाचनाची खूप आवड सो नावाला त्याची डिग्री .. रायटर झाला तो.
छानच आहे,आपल्याला जे आवडते जे जमते तेच करियर म्हणून निवडावे..आर्या म्हणाली.
अंधार पडायला लागला होता ,त्यांचं खाण ही झाले होते.मितेश म्हणाला,” आर्या कुठे राहतेस तू? मी सोडू का तुला?
नो वे मी माझी गाडी घेवून आली आहे.तशी ही मी खूप धाडशी आहे,सो डोन्ट वरी.,मी जाईन.रुइकर कॉलनीत राहते मी.
मी हॉटेल अयोध्या ला उतरलो आहे .मितेश म्हणाला.
अरे वा मग उलट मीच ड्रॉप करते तुला.
ओके बर झाल आर्या,नाहीतर मला याला सोडून परत गावात यावे लागले असते .निखिल म्हणाला.
आर्या ची सोबत अजून थोडा वेळ मिळणार म्हणून मितेश मनातून खुश झाला होता.आणि निखिल ला ही हेच हवे होते.मितेश च्या आयुष्यात जर प्रेमाचं माणूस येणार असेल तर त्याला आनंदच होणार होता .जुई नंतर मितेश एकटा एकाकी झाला होता.त्याच्या मनाच्या उजाड माळ राना वर प्रेमाचं,मायेचं फुल फुलायला हवे होते.
निखिल चा निरोप घेवून ते दोघे निघाले..
क्रमश..कथा कशी वाटते नक्की कमेंट्स करा.
