#माझ्यातलीमी
#अलकलेखन (१०.९.२५)
दिलेले शब्द… ट्रेन, स्टेशन, रुमाल,नजर, पाऊस
प्रतीक्षा
रेल्वे स्टेशनच्या पटरीजवळची छोटी झोपडी…तेच त्या चिमुकलीचं घर…रोज ट्रेनचा आवाज आला की धावत जाई..
आज मुसळधार पावसातही ती बापासाठी खुणेचा रुमाल हलवत आशाळभूत नजरेने पहात उभी राहिली..
होय, तिच्या मायने सांगितले होते … पटरीवरून घसरलेली ट्रेन तुझ्या बापाला घेऊन गेली…
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

बापरे .. फारच भारी
जबरदस्त
खूपच भारी .
खूप अप्रतिम अलक