अलक लेखन

inbound5014420910212616488.jpg

#माझ्यातली मी
#अलक लेखन टास्क
दिलेले शब्द — ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस.

वर्दीचा अभिमान मनी.आनंद ओसंडून वाही. आज स्वप्न पूर्ती झाली. दोघींही खुश. ट्रेनची वाट पाही. ​पाऊस रिमझिम पडतोय मनी स्वप्न रंगतंय, स्वागताला घर सजतंय.स्टेशनवर ट्रेन आली चढताना पाय घसरला प्लॅटफॉर्मवर अडकला तिचा,सखीचा जीव घाबरला.
​प्लॅटफॉर्मवर एकटी.“सखी, तू घाबरू नकोस काही.” रुमाल काढला पाय बांधन्यास.नजर एकटक जखमेवर.
पण पायच कुठे उरला.
~ अलका शिंदे

3 Comments

  1. बापरे,खूप सुंदर अलक…शेवटी नियतीपुढे कोणाच काही चालत नाही हेच खर ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!