योगामुळे घडलेला माझा अनुभव/ परिवर्तन

1001508560.jpg

#माझ्यातली मी.
#वीकेंडटास्क .
#समान ब्लॉग लेखन टास्क.
@everyone
दिनांक..६/८२०२५

(पिंडी ते ब्रम्हांडी या संकल्पनेवर आधारित कथा)
(भाग पहिला:- चंद्रकला जोशी.)

कथेचे शीर्षक:- आतून अनंताकडे…

एका शोधयात्रेची सुरुवात.
सूर्यनुकताच असताना चालला होता. नारंगी रंगाचे उबदार उष्णता डोंगर माथ्यावरून पसरत होती आणि ती सावळ्या तपस्वी चेहऱ्याच्या वृद्ध गुरुजींच्या आश्रमावर पडली होती. आश्रमाच्या अंगणात अर्णव नावाचा तरुण अत्यंत उत्साही पण गोंधळलेला शिष्य गुरुजींच्या समोर बसला होता. त्याच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते जे आज त्याला विचारायचे होते. तो नेहमीच विश्वाच्या रहस्यांनी मोहित होत असे. परंतु त्याचे ज्ञान पुस्तकी होते. आज त्याला प्रत्यक्ष अनुभवातून काहीतरी जाणून घ्यायचे होते.
” गुरुजी, अर्णव ने नम्रपणे विचारले,” मी गेली अनेक वर्ष ज्ञानसाधना करत आहे. वेद, उपनिषद, पुराणे मी सर्व काही वाचलं आहे. पण मला अजूनही ते,” मोठे रहस्य”, सापडत नाही. तुम्ही नेहमी,” पिंडी ते ब्रम्हांडी”. असे काहीतरी बोलता. पण त्याचा अर्थ मला अजूनही पूर्णपणे उमगला नाही. ब्रम्हांडांचे रहस्य इतके मोठे असेल, तर ते माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या,” पिंडीत” म्हणजे शरीरात कसे असू शकते.

गुरुजींनी अर्णव कडे शांतपणे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले,” तुझा प्रश्न योग्य आहे बाळा!. ज्ञान पुस्तकातून मिळते पण अनुभव हृदयातून येतो. आज मी तुला फक्त सांगणार नाही तर एक अनुभव देणार आहे.
पहिली पायरी, श्वासाचे रहस्य:-
गुरुजी उठले आणि अर्णवला एका जुन्या वडाच्या झाडाखाली घेऊन गेले. झाडाची मुळे जमिनीतून खोलवर पसरली होती. जणू काही ती पृथ्वीशी संवाद साधत होती.

अर्णवने डोळे मिटले. सुरुवातीला त्याचे मन सैरावैरा धावत होते….. आजच्या कामांची यादी, उद्याची चिंता, गुरुजी काय शिकवणार याची उत्सुकता. पण गुरुजींच्या शांत आवाजाने त्याला पुन्हा श्वासावर आणले.

आता पुन्हा श्वास घेताना, तो कसा आत जातो आणि बाहेर येतो याचा अनुभव घे. त्याच्या प्रत्येक स्पंदनावर लक्ष दे. श्वास आत घेताना कल्पना कर की तू या विश्वातील ऊर्जा आत घेत आहेस आणि श्वास बाहेर टाकताना, तुझ्या शरीरातील सर्व अशुद्धी, नकारात्मकता बाहेर टाकली जात आहे. अर्णव ने तसेच केले.

हळूहळू त्याचे मन शांत होऊ लागले. त्याला जाणवले की प्रत्येक श्वासासोबत त्याच्या शरीरात एक सूक्ष्म ऊर्जा प्रवेश करत आहे. आणि बाहेर पडत आहे. हा फक्त एक वायू नव्हता तर अदृश्य जीवनशक्ती होती. त्याला वाटले तो फक्त श्वास घेत नाही तर या विश्वाशी जोडला जात आहे. गुरुजींच्या शब्दांनी त्याला आतून एक वेगळीच भावना दिली.
“बाळा! पिंडी ते ब्रम्हांडीतील पहिला अनुभव!”
गुरुजींचा आवाज त्याच्या कानावर पडला. आपला श्वास हेच विश्व आणि त्यातील सेतुबंध आहे.
दुसरी पायरी, संवेदनांचा प्रवास:-
गुरुजींनी अर्णवला परत आश्रमात आणले. आता अंधार पडू लागला होता आणि दिवे लागण्याची वेळ झाली होती. गुरुजींनी अर्णवला एक वाटी दूध दिले ( गरम दूध)
” आता हे दूध पी!. पण प्रत्येक घोट शांतपणे अनुभव”, गुरुजींनी सूचना केली.
अर्णव ने दुधाचा पहिला घोट घेतला, त्याला दुधाचा गोडवा, त्याची उष्णता आणि त्याचा मऊपणा जाणवला. पण गुरुजींनी त्याला अधिक बारकाईने लक्ष देण्यास सांगितले.
” आता विचार कर, हे दूध कुठून आले? गाई कडून. गाईने काय खाल्ले? गवत. गवताला काय मिळाले? सूर्यप्रकाश, पाणी आणि मातीची एकत्र आलेली ऊर्जा. तू फक्त दूध पीत नाही तर या संपूर्ण सृष्टीची ऊर्जा तुझ्या शरीरात घेत आहेस”.

अर्णवच्या डोक्यात एक दिवा लख्ख पेटल्याचे जाणवले. त्याला जाणवले आपण जे काही खातो पितो ते केवळ अन्न नसते. ते तर ब्रम्हांडाचे एक स्वरूप असते. जे आपल्या शरीराचा एक भाग बनते. प्रत्येक कण, प्रत्येक घास, प्रत्येक संवेदना ही ब्रम्हांडाशी जोडलेली असते. त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशी या अनंत विश्वाचा अविभाज्य भाग आहे.

(हा पहिला भाग चंद्रकला जोशी , मी लिहिला आहे.
पुढचा भाग दुसरा- स्मिता बोंद्रे यांनी लिहिला आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!