विकेंड टास्क #समान ब्लॉग लेखन

# माझ्यातली मी.
# वीकेंड टास्क.
#समान ब्लॉग लेखन.
(भाग दुसरा: स्मिता बोंद्रे. भाग पहिला:-चंद्रकला जोशी)

पिंडी ते ब्रम्हांडी संकल्पनेवर आधारित कथा.
कथेचे शीर्षक:- आतून अनंताकडे….
भाग दोन :-

तिसरी पायरी, मनाचे विशाल आकाश:-
दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींनी अर्णवला बोलावले व त्याला घेऊन आश्रमापासून दूर असलेल्या एका टेकडीवरती गेले. टेकडीच्या माथ्यावरून खालचे सारे गाव, शेती, नद्या आणि दूरवरची पर्वत श्रेणी दिसत होती.

” अर्णव, आता डोळे उघडे ठेवून या अथांग दृश्याकडे पहा”गुरुजी म्हणाले. या क्षणी तुझे मन कुठपर्यंत पोहोचू शकते, तो या संपूर्ण दृश्याला पाहताना हे दृश्य डोळ्यात सामावून घेत आहेस. हे दृश्य पाहताना तुझ्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना या सर्व गोष्टी तुझ्या मनातच निर्माण होत आहेत”.
अर्णव ने डोळे भरून पाहिले. त्याला जाणवले की त्याचे मन किती विशाल आहे. ते एका क्षणात गाव ओलांडून पर्वतरांगांपर्यंत पोहोचू शकते, नद्यांच्या प्रवाहाबरोबर वाहू शकते, त्याच्या मनात अनेक विचार येत होते….. शांततेचे, सौंदर्याचे, विस्मयाचे……

गुरुजी म्हणाले,” आता डोळे मीट, अर्णव!. आणि तेच दृश्य तुझ्या मनात पाहण्याचा प्रयत्न कर. तू जे बाहेर पाहिलेस ते आता तुझ्या आत अनुभव”.
अर्णव ने डोळे मिटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला तेच दृश्य पुन्हा स्पष्टपणे दिसले…… गाव, नद्या, पर्वत किंबहुना त्याने आता त्यात आणखीन काही गोष्टींची भरच घातली. जसे, गावातील लोकांचे हसणे, नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज, वाऱ्याची झुळूक……

हे बघ अर्णव, गुरुजींनी स्पष्ट केले.” जे काही तू बाहेर पाहतोस, तेच तुझ्या मनात प्रतिबिंब होते. तुझे मन हे एका लहानशा बीजासारखे आहे. ज्यात संपूर्ण ब्रम्हांड सामावले आहे. तुझ्या कल्पना, तुझे विचार, तुझ्या भावना हे विश्वातीलच ऊर्जा स्वरूप आहे. तुझ्या एका विचाराने तू भूतकाळात जाऊ शकतोस, भविष्यकाळात डोकावू शकतोस हेच तुझ्या” पिंडी” तील” ब्रम्हांडाचे” स्वरूप आहे…… मनाची अथांग शक्ती.

अर्णव निशब्द झाला. त्याला जाणवले, ती त्याचे मन फक्त विचार करणारी एक यंत्रणा नाही तर ती एक विशाल आकाश आहे. ज्यात संपूर्ण विश्व सामावून घेण्याची आणि निर्माण करण्याची क्षमता आहे.

अंतिम साक्षात्कार, चेतनेचा विस्तार:-
गुरुजींनी आडवला पुन्हा आश्रमात आणले. गुरुजी आणि अर्णव ध्यानाला बसले. संध्याकाळ झाली होती सर्वत्र शांतता पसरली होती आता एक पाऊल पुढे टाक आणि तुझ्या चेतनेचा विस्तार कर.

कल्पना कर की तू फक्त हे शरीर नाहीस, तू या शरीराच्याही पलीकडे आहेस. तुझी चेतना हळूहळू विस्तारत आहे. ती तुझ्या शरीराच्या सीमा ओलांडून बाहेर पडत आहे. ति या आश्रमात पसरत आहे, गावावर पसरत आहे, संपूर्ण पृथ्वीला व्यापत आहे.

अर्णव ने डोळे मिटले आणि गुरुजींच्या सर्व शब्दांचे पालन केले. त्याला एक विलक्षण अनुभव येऊ लागला. त्याचे शरीर जणू अदृश्य झाले होते. त्याची चेतना अमर्याद बनली होती. त्याला जाणवले की तो फक्त अर्णव नसून तो या विश्वाचा एक भाग आहे. तोच वारा आहे, तोच वृक्ष आहे, तोच पर्वत आहे आणि तोच दूरवर चमकणारा ताराही आहे. त्याला सर्वत्र एकच ऊर्जा जाणवली, तो ब्रम्हांडापासून वेगळा नाही तर तोच ब्रम्हांड आहे.

या स्थितीला त्याला सर्व प्रश्न निरर्थक वाटले,” पिंडी” आणि” ब्रम्हांडी” दोन्ही शब्दही गौण झाले. फक्त एकच सत्य उरलं….. सर्वत्र एकच अविभाज्य अस्तित्व.

आत्मज्ञानच विश्व- ज्ञान:-
अर्णव जेव्हा ध्यानातून बाहेर आला, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आनंदाचे, कृतज्ञतेचे आणि साक्षात्काराचे!.
त्याला जाणवले की ब्रम्हांड कुठेही दूर नाही तर ते आपल्या आतच सामावलेले आहे. आपल्या श्वासात, आपल्या संवेदनात ,आपल्या मनात आणि आपल्या चेतनेते निरंतर अस्तित्वात आहे.
गुरुजी हसले,” अगदी बरोबर! बाळा… बाहेरच्या विश्वाचे रहस्य शोधण्याऐवजी जेव्हा आपण आपल्या आत डोकावतो तेव्हा आपल्याला कळते की आपण स्वतःच त्या अनंत ब्रह्मांडाचे एक लहानसे पण परिपूर्ण प्रति रूप आहोत.
आत्मज्ञानातच विश्वज्ञान दडलेले आहे. पिंडी जेव्हा आपल्यातील ब्रम्हांडीला ओळखतो तेव्हाच खऱ्या अर्थाने मुक्तीचा अनुभव येतो. हाच आपल्या जीवनाचा खरा उद्देश आहे.

आपल्या आतील अनंताला ओळखणे आणि त्यात विलीन होणे. खऱ्या ज्ञानाचा प्रवास बाहेर नाही तर आपल्या आतून सुरू होतो. आपल्याला बाह्य जगात जे काही मोठे, विशाल वाटते तेच आपल्या आत सूक्ष्म स्वरूपात अस्तित्वात आहे. आपल्यातील चेतनेचा विस्तार करून आपण स्वतःला आणि या विश्वाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.

भाग दोन:- स्मिता बोंद्रे
भाग एक:-चंद्रकला जोशी.
©®

25 Comments

  1. खुप छान …

    मी स्वतः पण योगा मुळे हा अनुभव घेत आहे .. त्यामुळे मनाला खूप भावली

  2. перепланировка нежилого помещения в нежилом здании законодательство [url=http://www.pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya11.ru]перепланировка нежилого помещения в нежилом здании законодательство[/url] .

  3. Thanks a bunch for sharing this with all folks you actually recognize what you are talking about! Bookmarked. Kindly also consult with my web site =). We could have a hyperlink trade contract among us
    escorts Brasilia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!