लग्न ठरल्यानंतर ते दोघे थोडे आडमार्गाला फिरायला गेले होते. आणि काही नराधमांनी डाव साधला. ह्या धक्क्यातून ती अजून सावरलीही नव्हती, आणि होणाऱ्या सासूबाईंनी लग्न मोडलं. त्याने तिचा एकही फोन घेतला नाही. शरीरावरचे आणि मनावरचेही व्रण सहन करत तिने त्याही अवस्थेत स्वतःला समजावलं. आज त्याच्या कंपनीतर्फे दर वर्षी होणाऱ्या ‘नवदुर्गां’च्या सत्कारात ‘बलात्कारित स्त्रियांचा आधार’ म्हणून तिचा होत असलेला सत्कार तो बघत होता.
-©️®️अनुपमा मांडके
०४/०९/२०२५

खूप मार्मिक अलक👌👌
सुरेख
👌🏻👌🏻
सुंदर 👌🏻👌🏻