#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
#निरोप
दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ, शाळेचा शेवटचा दिवस….’सुटलो बुवा एकदाचे, आता शाळा नाही म्हणजे कसलीही बंधन नाहीत. युनिफॉर्म, शिस्त, चपचपीत तेल लावून बांधलेल्या दोन वेण्या नाहीत. काही दिवसांनी कॉलेज लाईफ सुरू होईल, मौज, मजा, मस्ती, नुसती धमाल….एक नवीन सुरुवात’ खूप दिवसापासून ह्या क्षणाची वाट बघणाऱ्या अवनीच्या डोळयांच्या कडा आज मात्र ओलावल्या होत्या. सगळ जसंच्या तसं आठवत होतं, आईचा हात धरून केलेला बालवाडीतील प्रवेश, घरचा अभ्यास, लुटुपुटुची भांडणे, कट्टी बट्टी, खाऊचा डब्बा, सहल, स्नेहसंमेलन, बालवाडी ते दहावी पर्यंतचा प्रवास, बरचं काही…बालपण हातातून सुटताना दिसत होतं. नकळतच मोठं झाल्याची जाणीव होत झाली.
आपल्याला घडवणाऱ्या, संस्कार देणाऱ्या, शाळेला कसा काय निरोप देणार ह्या विचारात आठवणींची शिदोरी घेऊन अवनी जड अंतकरणाने घरी परतली.
©® मृणाल महेश शिंपी.
शब्दसंख्या – ११४


Chan
धन्यवाद 🙏🏻