#माझ्यातलीमी
#निरोप
#कथा
हे वय होत का रे तीच जाण्याचं ?
पहाटे फोनची बेल वाजली,दचकून जागी झाले . मावशीचा फोन असा अवेळी,हृदयात धस झालं. आपल्या प्रीतीचा अपघात झाला आहे , क्रिटिकल आहे सिटी हॉस्पिटलला ये.
पटापट आवरून आम्ही दोघेही रिक्षाने निघालो .
प्रीती माझी सख्खी मामेबहीण ,डॉक्टर ,तिचा नवराही डॉक्टर रविंद्र. तिला 2 वर्षाचा मुलगा . तिच्या केलवणाच्यावेळी घरी बोलावलेलं तेव्हा आल्याआल्या ताई हाक मारून घट्ट मिठी मारलेली ..जेवण झाल्यावर माझ्या मुलाशी लहान होऊन खेळलेली ..
डॉक्टर नवरा मिळाला म्हणून खुश होती , दोघांनी मागच्या वर्षी छान मोठा फ्लॅट घेतला ,दरवाजा वर लिहिलेलं रविप्रीत.. सगळं डोळ्यासमोरून जात होतं .
प्रीती तिच्या क्लिनिक मधून रात्री घरी स्कूटीवरून जात होती ,ट्रकने धडक दिली , डोक्यावर मार लागला ..त्यादिवशी रवी नेमका सेमिनारला गेलेला नाहीतर नेहमी दोघे कारने क्लिनिकला जायचे ,यायचे .. काळाने घात केला .. 2 वर्षाच्या बाळाला सोडून जाताना अस वाटत होत की ती सारखी वळूनवळून मागे बघत आहे ,देवाला म्हणते आहे ,नको बोलवू मला आता ,माझा रवी,माझा बाळ…
दुर्दैव तिचे आई ,वडील तिच्या भावाकडे कॅनडाला गेलेले..
जाताना सुहासिनी सजवताना माहेरची शेवटची साडी, शृंगार त्यामुळे मीच घेऊन आलेली.
पंधरा वर्ष झालीत अजूनही तिची आठवण येते तेव्हा देवाला ओरडून जाब विचारावासा वाटतो , हे वय होत का रे तीच जाण्याचं ?
तिचा मुलगाही उराशी स्वप्न बाळगून आहे , डॉक्टर होण्याचं ..
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या..200


खुप हृदयस्पर्शी
सुरेख