#माझ्यातलीमी #निरोप

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(१/९/२५)
#निरोप

निरोप हा शब्द जरी तीन अक्षरी असला, तरी निरोप देणं किंवा घेणं फार कठीण आहे. मग तो गणपती बाप्पाचा असो की आयुष्यात येणाऱ्या कुणाचाही असो.
आज गणपती बाप्पाचं विसर्जन, म्हणजे आपण त्याला निरोप द्यायचा! “का?” अर्थव आजी-आजोबांना विचारत होता. “हो रे, बाळा, आज आपला बाप्पा त्याच्या आईकडे जायला निघतो. पण तो जाताना मला खूप वाईट वाटतं, रडायलाही येतं,” आजी म्हणाली. “अर्थव, हा सृष्टीचा नियम आहे. येणारी प्रत्येक गोष्ट कधी ना कधी जाणारच.” बोलताना आजीला खूप वाईट वाटलं, आणि खोकल्याची उबळ आली.
“आजी, कशाला उगाच बोलत बसलीस? डॉक्टरकाकांनी तुला आराम करायला सांगितलं आहे ना?” साक्षी म्हणाली. “सगळं खरं आहे, पण गणपती बाप्पाचं सगळं व्यवस्थित पार पडलं की आनंद होतो. आणि अर्थवच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, तर त्याला निरोप म्हणजे काय, प्रसाद का करतात, बाप्पाला आणि इतरांना निरोप का द्यावा लागतो हे कसं समजणार?” आजी म्हणाली.
“आजी, म्हणजे आता गणपती बाप्पा आपल्याकडून त्याच्या आईकडे जाणार? मग तो पुढच्या वर्षी परत येणार?” अर्थवने विचारलं. “हो, पुढच्या वर्षी परत येणार,” आजी म्हणाली. “तुला पण वाईट वाटतं का?” “हो रे, मला खूप वाईट वाटतं.”
“अर्थव, चल, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आजी-आजोबांना आता आराम करू दे,” साक्षी म्हणाली. “अर्थव, तुला माहिती आहे का, गेल्या वर्षी तू असंच आजी-आजोबांना त्रास दिलास, तर त्यांनाही आपल्याला निरोप द्यावा लागेल. म्हणजे ते देवबाप्पाकडे निघून जातील, परत कधीच येणार नाहीत. जसं आपण नानी-आजीला निरोप दिला तसं.”
“आता आजी-आजोबा थकलेत. त्यांनी एवढी वर्षं खूप काम केलंय. आता त्यांचं वय झालंय. म्हणून त्यांना जास्त त्रास द्यायचा नाही,” साक्षी म्हणाली. “ताई, मी आता त्यांना त्रास देणार नाही. पण आजी-आजोबा आपल्याजवळच राहिले पाहिजेत. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी परत येईल, पण आजी-आजोबांना निरोप दिला, तर ते परत येणार नाहीत,” अर्थव म्हणाला.
“आई-बाबांना मी सांगणार आहे, की आजी-आजोबांना काकांकडे पाठवायचं नाही. त्यांना बाय-बाय करताना खूप वाईट वाटतं. आत्या काल आली आणि लगेच गेली, मला वाईट वाटलं. पण तिला निरोप द्यावा लागला ना? काकांना सुमी ताईला, सुबोध दादाला डबा करून द्यावा लागतो. ती अधूनमधून आपल्याकडे येते,” अर्थव म्हणाला.
“चल ताई, आपण आजी-आजोबांना मदत करू. गणपती बाप्पाच्या निरोपासाठी आजी तळलेले मोदक करते. आपण तिला मोदकात सारण भरायला मदत करू,” अर्थव म्हणाला

#१९५_शब्द

#०१_०९_२०२५_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

672 Comments

  1. Нужен трафик и лиды? avigroup казань SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!