🌹 जखम 🌹
जखम मनाची, कुणालाच ती दिसत नाही,
हसऱ्या चेहऱ्यामागे ती लपून राहते,
शब्दांचे घाव सोसता, रक्त नाही वाहत,
पण मनाच्या आत ती सलतच राहते.
जखम शरीराची, औषधांनी ती भरते
काळानुसार तिचा व्रण फिका होत जातो,
वेदना जाते, पण आठवण बाकी उरते
प्रत्येक स्पर्शाने भूतकाळ तो आठवतो.
जखम काळजाची, खोलवर ती रुतते
विश्वासाच्या तुटलेल्या तुकड्यांनी ती बनते,
समोरच्याला काहीच कळत नाही
पण हृदयाच्या ठोक्यांत ती जागी राहते.
जखम नात्यातली, शब्दांनी ती दिली जाते
सुगंधासारखी नाती ती क्षणार्धात संपवते,
नात्यांच्या जखमा कधीच भरत नाहीत
भरल्या तरी वेदनारुपी गाठ नेहमी राहते.
आयुष्य कसं जगतो, हा जखमेवरचा उपाय
प्रत्येक जखमेवरचा इलाज,काळच असतो,
जखम असली तरी, जगणं सोडायचं नाही
कारण प्रत्येक जखमेनंतरच, नवा धडा मिळतो.
~अलका शिंदे

खूप छान
खूप धन्यवाद मॅम 🙏🏼
115s2x
**mitolyn official**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.