मितेश. अजून जुईचाच विचार करतोस काय? . निखिल. नाही रे ती आहेच कायम मनात,हृदयात तिचा विचार नाही करत. मितेश. हम्म पण फेमस रायटर झालास तू मित्या खूप छान वाटलं आणि अभिमान सुद्धा. निखिल. निक्या चल आपण खाली डायनिंग लाच जेवायला बसू जरा 2/4 शॉट्स पण मारू.
खूप दिवसांनी भेटतोय आपण यार. . मितेश. ये हुई ना बात म्हणत निखिल ने त्याला टाळी दिली. दोघ रूम लॉक करून डायनिग कड़े आले. मस्त थंडग़ार हवा जाणवत होती. कोल्हापुरचे हे वैशिष्ट्य होते की कोणी ही बाहेरचा माणुस येऊद दे तो या वातावरणात रमुन जातोच जातो. सो मितेश ला ही आवड़ायचे कोल्हापुर. शान्त समाधानी वाटायचे इथे. दोघांनी एक टेबल निवडले आणि व्हिस्की ऑर्डर केली. कॉलेज च्या आणि इतर मित्रांच्या गप्पा चालल्या होत्या. निखिल ने विचारले मित्या परत कोणाच्या प्रेमात नाही पडलास? कोणी नाही आवडली का? तू तर आता फेमस रायटर झालास ना? मग? नाही रे बऱ्याच मुलींचे फोन,मेसेजेस मेल येत असतात .माझ्या लिखानाच कौतुक करतात पण मी लक्ष नाही देत. का अस मितेश आयुष्यभर एकटाच राहणार आहेस का? माहित नाही निक्या आम्ही पडलो रायटर आमच्या कड़े कुठे भरपूर पैसा आणि आजच्या मुलींना करोडपती बिझनेस मन हवा असतो. प्रेमाच मोल पैशाने केल जात. यू आर रॉन्ग मितेश सगळ्याच मूली पैशाला महत्व देत नसतात. उगाच एका मुलीवरून सगळ्यांना गेस नको करूस. अरे मी जुई वरुन नाही बोलत उलट ती तयार होती लग्नाला पण तिच्या आई वडिलांना रायटर जावई नको होता रे, मे बी. निखिल ते सोड आता पुण्याहुन येताना एक मूलगी माझ्या बाजुला बसली होती. इतकी सुंदर होती की बस्स नुसत तिच्या कड़े बघत बसाव अशी. मग बोल्लास की नाही तिच्याशी? तस थोड़ बोलण झाल . ती माझ्या एका कार्यक्रमाला आली होती पब्लिकेशनच्या. छान लिहिता पण सैड लिहिता म्हणत होती. अच्छा काय नाव तीच? निखिल ने विचारले आर्या मीतेश म्हणाला. ओ नाइस नेम मग फोन नम्बर घेतलास का? नाही रे एकाच भेटीत कोण नम्बर देईल? त्याला काय होत मागायचा नम्बर . हम्म तू लाजाळुच पान तू कधी नम्बर मागनार नाही का? . अरे तसे नाही बरोबर नाही लगेच नम्बर मागण. मग आता कधी भेटणार ती तुला पुन्हा? अरे मला कुठे तिला भेटायचे ? ओह जरा बघ नुसता तिचा विषय निघाला तरी तुझा चेहरा उजळून निघाला आहे डोळे आनंदाने चमकत आहेत. नक्कीच ती आर्या ख़ुप सुंदर असणार.निखिल हसत म्हणाला हम्म सुंदर तर ती आहेच पण एका भेटीत का प्रेम होत. काही ही तुझ निक्या. पहिली नजर पहिला प्यार अस तुम्ही रायटरच म्हणता ना?
क्रमशः…आवडते का कथा? नक्की कमेंट्स करा.

