#माझ्यातली मी
#अलका लेखन (२०.८.२५)
#दगड
पुराने गिळंकृत केलाय अख्ख्या गावालाच. पण ती व तिचे दोन लेकरं वाचले कसेबसे. गाळात तग धरून आहेत अन्न पाण्यावाचून. एक तापाने फणफणतोय तर दुसरा मरणासन्न अवस्थेत बेशुद्ध आहे. तापे भरल्या लेकराला उराशी घेऊन निघालीय त्याचा जीव वाचवायला.एकाला तिथेच ठेऊन.
कुणास ठाऊक दगड नेमका कुठे ठेवला तिने
मनावर की त्या तान्ह्यावर?


छान
मस्तच
khup chhna