आपल्या मैत्रिणीची आणि त्याची मैत्री योग्य मार्गावरून चालत असल्याचं बघून तिला फार बरं वाटत होतं. त्याचा आणि तिचा साखरपुडा झाला होता. तिला मनापासून आवडत होता तो. पण तरीही मनावर दगड ठेवून निर्णय घेऊन तिने त्या दोघांची मैत्री फुलू दिली होती. आपल्या आवडत्या व्यक्तीला विश्वासातल्या माणसाच्या हाती सोपवून जायचं होतं तिला शेवटच्या प्रवासाला….. तिचा कॅन्सर बरा होण्याच्या पलीकडे गेला होता आता…..
-©️®️अनुपमा मांडके
२०/०८/२०२५

Very nice
Masta 💯💯
छान 👌
खूप सुंदर
खरं प्रेम त्यागात असतं…