#माझ्यातलीमी
#अलकलेखन ( २०/८/२५)
#निर्णय
“मनावर दगड ठेवून त्याने /तिने हा निर्णय घेतला” या वाक्याचा वापर करून लिहिलेली अलक …
नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्याकडे बघण्याचा सहकाऱ्यांचा दृष्टिकोनच बदलाला. कोणी तडजोड करायला सुचवत होते तर कोणी मदतीचा हात पुढे करत स्वार्थ साधायचा प्रयत्न करत होते. तिच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या एकाने तिच्या पुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मनावर दगड ठेवत तिने पर्याय स्वीकारला. त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिला घातलेली मागणी तिच्या असहायतेचा फायदा घेण्याचाच एक प्रकार असला तरी कमीतकमी तो विवाह बंधनात अडकून कायदेशीररीत्या नात्यास नाव देण्यास तयार तरी झाला होता.
©® मृणाल महेश शिंपी.

सुरेख अलक
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻