#माझ्यातलीमी
#अलकलेखन (२०.८.२५)
ती आणि तिची सून पोटासाठी चार घरी कामं करीत. पण तरणाताठा बिनकामी मुलगा रोज नशेत घरी येई. पैश्यासाठी सुनेला शिव्या, अरेरावी, मारझोड…
ती उघड्या डोळ्याने पहात होती. मुलगा बापावरच गेला शेवटी..! पण आता मी सुनेच्या मागे उभी राहणार..!
आणि मनावर दगड ठेवून तिने निर्णय घेतला… पोलिस स्टेशन गाठले…!
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

Khup chhaan
सुरेख
👌👌