#माझ्यातलीमी
#अलकलेखन (२०/८/२५)
“मनावर दगड ठेवून त्याने / तिने हा निर्णय घेतला” हे वाक्य वापरून #अलक
***बाळासाठी _मनावर दगड***
ऑफिसच्या बिल्डिंग ला आग लागली .दोघे अडकले, त्याला तिला वाचवणं कठीण होत होत ..ती मात्र विनवण्या करत होती की माझा विचार करू नकोस ,तू खिडकीतून उडी मारून जा ,आपल्या दोघांपैकी एक वाचणं तरी गरजेचं आहे ..मनावर दगड ठेवून रडत रडतच त्याने तिला सोडून उडी मारली ..
तो पाळणाघरात बाळाला घ्यायला गेला तेव्हा त्या बाळाला कल्पनाही नव्हती त्याच्या आईचा स्पर्श त्याला पुन्हा होणार नाही ..
©️®️ सौ स्वाती येवले (२०/८/२५)


हृदयस्पर्शी अलक
खुप छान .. खूप भावनिक अलक
Very nice
खूप छान .. खूप भावनिक अलक
हृदयस्पर्शी
Thanks 🙏
Thanks 🙏
Thsnks
Thanks 🙏
Nice