#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
#आऊटिंग आणि स्वातंत्र्य दिन
“ऋतुजा, उद्या तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का?” आईने विचारले.
“आई, हे काय विचारणं झालं! उद्या 15 ऑगस्ट, शुक्रवार आहे, आणि पुढे दोन दिवस सुट्टी आहे. आमचा विकेंड प्लॅन ठरलेलाच आहे. मस्त समुद्रकिनारा किंवा एखादा गडाचा ट्रेक, चिल मारायचा विचार आहे. असे प्रश्न तुम्ही दरवेळी का विचारता?” ऋतूजा म्हणाली.
“मी, रोहन, विकास, कुणाल, नयना, विदीशा आणि बाकी सगळे बहुधा दिवेआगरला जाणार आहोत.”
“जा हो, पण उद्या स्वातंत्र्यदिन आहे. स्वातंत्र्यासाठी किती जणांनी त्याग, बलिदान आणि कष्ट सहन केले, याचा विचार करा. तुम्हा तरुणांना त्याची कदर नाही आणि हा दिवस फक्त आऊटिंगसाठी वापरता, हे मला पटत नाही. सोसायटीत ध्वजारोहण झाल्यावर जा. तुम्ही विचार केला नाही, तर पुढची पिढी तुमच्याकडून काय शिकेल? याचा विचार करा आणि सांगा.”
“आई, बरं झालं तुम्ही आमचे डोळे उघडले. उद्या आम्ही ध्वजारोहण झाल्यावरच नाही, तर आमचा प्लॅन बदलतोय. आम्ही घरीच राहू. सोसायटीच्या ध्वजारोहणाला सगळे एकत्र जाऊन एन्जॉय करू. खूप वर्षांनी मी आणि रोहन ध्वजारोहणाचा सोहळा पाहणार आहोत.”
#१४१शब्द
#१५_०८_२०२५_शुक्रवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

अशा उपदेशाची गरज आहेच