#माझ्यातली मी…
#शतशब्द कथा
#दि -१५/८/२०२५
#स्वातंत्र्यादिन आणि आऊटिंग
🌹स्वातंत्र्याचा खरा सोहळा🌹
यामिनी, जय आणि राघव स्वातंत्र्यदिनाला महाबळेश्वरला जाण्यासाठी निघाले, पण वादळी पावसामुळे रस्त्यात भलेमोठे झाड पडले, त्यामुळे त्यांचा मार्ग अडकला. जवळच्या गावात थांबले असता त्यांनी पाहिले की एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात पाणी शिरून त्यांचे घर कोसळण्याच्या स्थितीत होते. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या दोघांना बाहेर काढून सुरक्षित शाळेत नेले. काही क्षणांतच त्यांचे घर कोसळले.
वादळ थांबल्यावर वृद्ध दाम्पत्याने त्यांचे आभार मानले. “तुम्ही आज आम्हाला स्वातंत्र्य दिलं,” असे ते म्हणाले. हे ऐकून तिघांनाही स्वातंत्र्यदिनाचा खरा अर्थ कळला. फिरायला जाण्याऐवजी मदतीचा आनंद त्यांना अधिक महत्त्वाचा वाटला. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांच्या नवीन घरासाठी निधी गोळा केला.
त्याच शाळेत सगळ्यांसोबत राष्ट्रगीत गाऊन त्यांनी खरा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
शब्द संख्या १०३ ~अलका शिंदे
