#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन
12/8/25
शिक्षणाचा वसा
सूर म्हणतो साथ दे , दिवा म्हणतो वात दे , अंधारातल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे… नटसम्राट नाटकाचा असाच काहीसा डायलॉग आबा आठवत होते .. त्यांना माहीत होत की त्यांची जायची घटिका जवळ येत चालली आहे .. पण ह्या क्षणी , ना पोटची मुल जवळ , ना त्यांनी अनंत उपकार केलेले अनेक मंडळी त्यांच्या जवळ … त्यांना आठवलं , त्यांनी कितीतरी जणांना मग त्यात पुतणे,भाचे , अगदी साधी तोंड ओळख असलेली माणसे ह्यांना गावावरून मुंबईत आणलेलं , त्यांची राहायची सोय , त्यांच्या चाळीतल्या छोट्यांच्या घरात केलेली आणि त्यांना नोकरी लागेपर्यंत फुकटात त्यांची सोय केलेली .. शीला त्यांची पत्नी त्यांच्या ह्या स्वभावाला साजेशा होत्या त्यामुळे त्यांनी ही लोकांची अशी फुकटची ऊठबैस मनापासून केलेली ..दोन वर्षांपूर्वी शीला गेली आणि एकट घरी राहण्यापेक्षा वृद्धाश्रम गाठलं.. वृद्धाश्रमात ही जे वृद्ध मुलांनी सोडलं इथे म्हणून दुःख करायचे ,त्यांचा ते आधार बनले .. करणाऱ्याने करत रहावे , देणाऱ्याने देतच राहावे ते ही निरपेक्ष बुद्धीने ,अगदी मुलांकडून ही अपेक्षा ठेवू नका , असा कानमंत्र ते बाकी वृद्ध मित्रांना देत असत..मी शाळेत शिक्षक होतो तेव्हा मुलांनाही ही शिकवण दिलेली अस आवर्जून आबा त्यांच्या मित्रांना सांगायचे ..
वृद्धाश्रमात त्यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला , बाजूलाच अनाथ आश्रमातील मुलांना ते , काही वृद्ध मित्र जाऊन शिकवायचे , गोष्टी सांगायचे ,आजोबांचे प्रेम द्यायचे ..
त्यादिवशी , अचानक आबांना चेक करायला नेहमीच्या डॉ ऐवजी दुसरे डॉ आले आणि त्यांनी आबांना हाक मारली , सर तुम्ही इथे ? मला ओळखल का मी तुमचा आवडता विद्यार्थी उल्हास पाटील.. डॉ उल्हास हट्टाने आबांना त्यांच्या घरी गेले , करोना मध्ये डॉ असून मी माझ्या आई वडीलांना नाही वाचवू शकलो आता तुम्ही इथेच राहायचं .. शाळेत असताना माझ्याकडे फी चे , पुस्तकांचे पैसे नव्हते तेव्हा तुम्ही मला केलेली मदत मी नाही विसरू शकत .. आपण दुसऱ्यासाठी करतच रहावे हे जे तुम्ही संस्कार माझ्यावर केलेत त्या नुसार हॉस्पिटल मधून सुटल्यावर, मी फिरता दवाखाना ही सुरू केला आहे , मी स्वतः गरीब रुग्णांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना इलाज देतो ..
डॉ उल्हास ने शेवटपर्यंत आबांची सेवा केली आणि त्यांना अग्नी देताना तो म्हणाला , सर तुम्ही दिलेला शिक्षणाचा वसा ” आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगल केलं आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं ” मी कधीच विसरणार नाही ..
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या 352


छानच कथा