#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन
#उपरती

“काय झालं संजय? चेहरा का पडलाय् तुझा आल्यापासून?”सावित्रीबाईंनी शेवटी न राहवून विचारलंच. मनाविरुद्ध काही घडलं, की एकटंच कुणाशी न बोलता बसून रहायची संजयची लहानपणापासूनची सवय सावित्रीबाईंना काही नवीन नव्हती. पण त्याचं मन मोकळं व्हावं म्हणून त्यांनी विचारलं. संजयही त्यांच्या प्रश्नाचीच वाट बघत होता. “अगं आई, त्या निलेशने त्याच्या बहिणीच्या लग्नाला ऑफिसमधल्या सगळ्यांना बोलावलं, पण मला नाही बोलावलं.”
“निलेश म्हणजे तोच नं, ज्याच्या बहिणीसाठी स्थळं बघायला तुला बरोबर घेऊन जात होता तो?” सावित्रीबाईंनी विचारलं.
“हो गं, तोच. नुसती स्थळं बघायला नाही, त्यांची माहिती काढायला, इतरांकडे त्यांची चौकशी करायलाही मला घेऊन जात होता. आणि आता बघ, गरज सरो नि वैद्य मरो.”संजय पुन्हा उसळला.

त्याचा राग अनाठायी नक्कीच नव्हता, पण त्या रागामुळे त्रास त्यालाच होत होता. रक्त आटत होतं त्याचं. कसं समजवावं या मुलाला, की तुझ्या धुसफुसण्यामुळे, त्रागा करून घेण्यामुळे हे स्वार्थी जग बदलणार नाहीये…..

सावित्रीबाईंना गेले अनेक दिवस संजयची धावपळ दिसत होती. निलेशच्या बहिणीच्या लग्नासाठी अगदी सख्ख्या भावासारखा चपला झिजवत होता. एक-दोनदा त्यांनी त्याला सावध करायचाही प्रयत्न केला, ”पुरे आता, फार वाहवत जाणं बरं नाही. लोकांना किंमत नसते रे, केलेल्याची.”
“अगं आई, निलेश एकटा किती करेल गं? आई-वडील असते तर ठीक होतं! इतर नातेवाईकांनी तर हात झटकून टाकलेत.”
संजय कळवळून म्हणाला. सावित्रीबाईंनाही बिचाऱ्याची दया आली. त्यांनीही मग विषय वाढवला नाही.

स्वयंपाक करता-करता भूतकाळ त्यांच्या नजरेसमोरून सरकत होता. संजयवर प्रभाकररावांचा लहानपणापासूनच फार पगडा होता. तेही असेच. कुणाच्याही मदतीला धावायचे. कुणी एखादा कृतज्ञता व्यक्त करायचा, पण बहुतेक जण काम झालं, की त्यांना विसरून जायचे. दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादात घराकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. सावित्रीबाईंनी सगळं निभावून नेलं. प्रभाकररावही कधी कुठली गोष्ट मनाला लावून घेऊन बसले नव्हते. पण संजयचा स्वभाव थोडा वेगळा होता. हळवा होता.

कसं-बसं बळेबळेच सावित्रीबाईंनी संजयला जेवायला भाग पाडलं. सगळी झाकपाक करून झाली तरी संजयची मनःस्थिती काही बदलली नव्हती. शेवटी सावित्रीबाई म्हणाल्या, “ अरे संजय, तू तुझ्या आनंदासाठी करतोस ना मदत लोकांना? मग त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा का करतोस? हे बघ, अपेक्षा आली, की अपेक्षाभंगाचं दुःख आलं; तुला जर आनंदाने जगायचं असेल, तर दोन गोष्टी तुला विसरायला हव्यात – एक, तू इतरांसाठी काय चांगलं केलंस, आणि दुसरी, इतरांनी तुझं काय वाईट केलं…..”

आईचे अनुभवाचे बोल संजयला मनोमन पटले. त्याला उपरती झाली. त्याने ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली, की आता कुणाकडून कधी कसली अपेक्षा करायची नाही.
(शब्दसंख्या – ३५१)
-©️®️अनुपमा मांडके
११/०८/२०२५

9 Comments

  1. Рабочее кракен зеркало обновляется каждые два месяца для предотвращения блокировок и обеспечения непрерывного доступа к маркетплейсу всех пользователей.

  2. Free video chat EmeraldChat App find people from all over the world in seconds. Anonymous, no registration or SMS required. A convenient alternative to Omegle: minimal settings, maximum live communication right in your browser, at home or on the go, without unnecessary ads.

  3. Быстрый кракен вход выполняется через решение капчи из восьми символов и двухфакторную аутентификацию для защиты аккаунта от несанкционированного доступа.

  4. Нужна работа в США? школа диспетчеров онлайн : работа с заявками и рейсами, переговоры на английском, тайм-менеджмент и сервис. Подходит новичкам и тем, кто хочет выйти на рынок труда США и зарабатывать в долларах.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!