बॉक्स -ऑफिस

………… बॉक्स -ऑफिस………
मंडळी कसे आहात……
बरे आहात ना !
बरेच असाल, कारण आज मी आपणांसमोर तुमचा आवडता शो घेऊन येत आहे.
नमस्कार मंडळी……
आज शुक्रवार आपल्या वीकेंड टास्कचा वार. आज मी अंजली तुम्हा सर्वांसाठी एक आगळावेगळा टास्क घेऊन आली आहे. टास्क चे नाव” बॉक्स- ऑफिस “. आपल्या” बॉक्स ऑफिस” शो मध्ये आपले मनापासून स्वागत.
मंडळी,
चित्रपट म्हटले की तो प्रदर्शित झाल्यापासून तर तिकीट विक्रीपर्यंत मिळणारा एकूण महसूल हा महत्त्वाचा आहे. त्याचे बजेट लक्षात घेतले तर चित्रपट हा यशस्वी झाला की नाही हे त्याच्या कलेक्शन वर अवलंबून असते. कलेक्शन हे बजेट पेक्षा जास्त असेल तर चित्रपट हा नक्कीच यशस्वी होतो.
मंडळी,
आज आपण आपणा सर्वांना आवडणाऱ्या मराठी चित्रपटाकडे वळूया…….
चित्रपटाचे नाव “भूक “. हा चित्रपट मागच्या शुक्रवारी प्रसिद्ध झाला. या चित्रपटाचे निर्माते आनंद कदम असून दिग्दर्शन राहुल रॉय यांनी केले आहे. या चित्रपटातील गायिका सुरमई देसाई ह्या आहेत….. कलाकार मंदार जोशी आणि मोहिनी आपटे …..
मंडळी,
या चित्रपटातील जोडी…. जी आपली खास आवडती जोडी. कोणती सांगा बरं. चित्रपट बघितला असेल तर नक्कीच सांगू शकाल.
हं.. बघितलंय नं……
मग सांगा बर कोणती जोडी.
हं बरोबर ओळखलंत….. मंदार जोशी आणि मोहिनी आपटे……
मंडळी,
“भूक “या चित्रपटात अभिनेता मंदार आणि अभिनेत्री मोहिनी यांची उत्कृष्ट भूमिका म्हणून ही जोडी खूप गाजली गेली.
मंडळी,
या चित्रपटाचे कथानक मी सांगणार नाही पण ज्यांनी हा चित्रपट बघितला नसेल त्यांनी तो आवर्जून बघावा यासाठी थोडासा संकेत देऊ इच्छिते. अभिनेत्री मोहिनीने केलेली मंदाची भूमिका….. ती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून एकदम सुखवस्तु घराण्यात येते पण हलाकीचे वास्तव ती विसरत नाही. घासातला घास काढून ती गरिबांचे पोट भरते. त्यातूनच ती एवढेच शिकते की प्रत्येक जीवात एकच परमात्मा असतो. त्याचीच खूण तिला पटली असावी. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात इतकी कमाई केली की त्याने यश शिखरच गाठले.
मंडळी,
यातील मला आवडलेलं गाणं तुम्ही ऐका….तोपर्यंत मी अशी जाते आणि अशी येते……
गाणं….. देवा, किती भूक शमवू मी आता…..
जाहिरातीचा फलक……
भूक शमविण्यासाठी चायनीज खा..नक्कीच भूक शमेल…..
नमस्कार मंडळी,
ब्रेक नंतर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत….
मंडळी ऐकलंत का गाणं. कारण हे गाणं हृदयस्पर्शी आहे.नक्कीच ते तुमच्या पर्यंत पोहोचलं असेलच.
आता आपण परत दुसऱ्या चित्रपटाकडे वळूया…….
मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला चित्रपट “हिरवागार ताटवा.” या चित्रपटाचे निर्माते कौशिक खरे असून दिग्दर्शक अजित वासवानी व आलिशा वासवानी हे आहेत. यातील सगळेच कलाकार हे आपले सगळ्यांचेच आवडते आहेत. आपले आवडते कलाकार असले की आपण नक्कीच तो चित्रपट बघतो.
मंडळी,
या चित्रपटातील जोड्या सांगाव्या तर किती……
या चित्रपटात तीन जोड्या आहेत……
१… निकिता पांडे…. निखिल वाणी
२… मनोज कुलकर्णी…. दीक्षा प्रभुणे
३… ध्रुव वैद्य…. साक्षी पितळे
मंडळी,
आहेत ना या जोड्या तुमच्या आवडीच्या..
माझ्या तर आहेच.
तुमच्या… हं आहेत..
मला वाटलंच मुळी……
सगळ्यांनी खूप चांगली आपापली भूमिका निभावली. चित्रपट हा बघण्यासारखा आहे वा नाही पण. त्यातील स्त्री पात्रांच्या भूमिका सुरुवातीला बोलायला खूपच अबोल असतात पण पुढची परिस्थिती त्यांना बोलकी करते. कारण त्यांचं असणारं निसर्गावरील नितांत प्रेम. सगळ्यांनाच फुलांची आवड तितकीच त्यांच्या जोडीदाराची आवड शून्य फुलांविषयी….. पण त्या तिघींही त्यांची बाग फुलवून आपला आनंद साजरा करतात.
पण अचानक……. झाडांवर भयंकर कीड पडून फुलबाग कोलमडून जाते.
पण मंडळी,
यावर तर उपाय असतोच ना…… पण कोणताही उपाय अंमलात न आणता त्या हार मानून बाहेर पडतात. चित्रपटाच्या शेवटी नकारात्मकता आली म्हणून हा चित्रपट पडतो…..
मंडळी,
ज्यांना असा चित्रपटाचा शेवट आवडत असेल त्यांनी तो नक्कीच बघावा…..
मी तर एकदा बघूनच पस्तावले….
मंडळी,
आता जाहिरात आहे तोपर्यंत मी अशी जाते आणि अशी येते…..
जाहिरात……
डोईवर जड झाली…. त्रागा…त्रागा… त्रागा……
मंडळी,
ब्रेक नंतर आपले या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे…..
आता आपला तिसरा चित्रपट “विरंगुळा.”
विरंगुळा या चित्रपटाचे निर्माते.. कैवल्य चौधरी व दिग्दर्शन… आनंद केवले व अनन्या केवले यांनी केले आहे…… गायिका शितल पांडे ह्या आहेत.
हा चित्रपट प्रदर्शित मनावर अजिबात येतात होऊन तीन आठवडे झाले. या चित्रपटात मनावर अजिबात ताण न येता त्या विरंगुळ्यात आपण स्वतःला पार झोकून देतो. याचमुळे हा चित्रपट उच्च शिखर गाठू शकला.
“विरंगुळा “हा चित्रपट मनोरंजनाला खिळवून ठेवणाराआहे. त्यातील जोडी म्हणजे……
आकाश भावे आणि आकांक्षा वैद्य…… ही या चित्रपटात उत्कृष्ट जोडी म्हणून गाजली आहे. आपल्यासाठी हे कलाकार नवीनच आहेत. हा चित्रपट पाहायचा म्हणजे दैनंदिन कामातून वेळ काढून बघण्यासारखाच चित्रपट आहे.
…… यात कोकणचे सौंदर्य व झोपाळ्याचे आकर्षण…… यातील विरंगुळा हा वेगळाच आहे.
या चित्रपटातील मला आवडलेलं एक गाणं तुम्ही ऐका तोपर्यंत मी अशी गेली आणि अशी आले……
गाणं……
झोक्यात झोका घेऊ या, लांब वेणी फेकू या…..
मंडळी,
ब्रेक नंतर या कार्यक्रमात तुमचं पुनश्च स्वागत….
काय मंडळी कसं वाटलं गाणं..आहे ना सुंदर! आपल्याला खिळवून ठेवणारं.
मंडळी,
मी आपणांसमोर मराठी तीन चित्रपटांचा लेखाजोखा समोर मांडला आहे. ज्यांनी कोणी हे चित्रपट पाहिले नसतील तर त्यांनी त्यातला “भूक “आणि “विरंगुळा “हे दोन्ही चित्रपट आवर्जून बघावे. “भूक “या चित्रपटाची बोधप्रद चित्रपट म्हणून गणना आहे तर “विरंगुळा” हा चित्रपट मनोरंजनाकडे वळवतो.
मंडळी,
आजचा शो तुम्हाला नक्की आवडला असेलच अशी आशा व्यक्त करते. तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये त्याची प्रतिक्रिया देऊ शकता……
मंडळी..आता टाटा बाय-बाय करण्याची वेळ आली आहे…..मी आपली आवडती अंजली आपला निरोप घेते….परत भेटू एकदा पुढच्या महिन्यातल्या दुसऱ्या शुक्रवारी..
“बॉक्स -ऑफिस “शो मध्ये …..
धन्यवाद….
चला तर मंडळी लवकरच भेटू परत…… 👏👏
…….. अंजली आमलेकर…….. २/८/२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!