माय बॉक्स ऑफिस

inbound5824888240016300165.jpg

#माझ्यातलीमी
#मायबॉक्सऑफिस
#वीकेंडटास्क
#मीवीजे
१/८/२५

नमस्कार मंडळी , कसे आहात सगळे ? मजेत ना? मजेतच असाल कारण तुम्ही माझा धमाल करमणुकीचा शो रोज बघता .
तर मी वीजे स्वाती ,तुमच्या सर्वांचे माझ्यातली मी ह्या चॅनल वर मायबॉक्सऑफिस
ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करत आहे ..

“बायाच जगात भारी ” ह्या मराठी चित्रपटा ने बॉक्स ऑफिसवर लक्षणीय यश मिळवले आहे, जो आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. जगभरात या चित्रपटाने ₹९६ कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे, ज्यामध्ये भारतातूनच ₹७६.०५ कोटी आले आहेत ..
प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली .

तर आपण बघितलं की शिल्पा शेंडे दिग्दर्शित , दाते प्रोडक्शन चा “बायाच जगात भारी ”
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे ..चित्रपट यशस्वी होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी काही प्रमुख कारणं म्हणजे, चित्रपटाची कथा, त्यातील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, आणि महिलांच्या भावनांना आणि संघर्षांना दिलेली वाचा.

सात मैत्रिणीच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर आधारित ही कथा आहे.
चित्रपटातील सर्व कलाकारांनी खूप चांगली भूमिका साकारली आहे.
चित्रपटात महिलांच्या भावना, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या संघर्षांना वाचा फोडण्यात आली आहे, ज्यामुळे महिला प्रेक्षकांना चित्रपटाशी लगेच कनेक्ट करता आले.
चित्रपटात विनोदाची आणि भावनांची योग्य सांगड घातली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येत नाही.चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत खूप छान आहे.चित्रपटातून एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे, की बायकांच्या भावनांचा आणि कर्तृत्वाचा आदर समाजातील प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे .. चित्रपट यशस्वी होण्याचे अजून एक कारण हे आहे की महिला मंडळांचे अनेक ग्रूप जसे भजनी मंडळ , भिशी ग्रुप, जेष्ठ नागरिक महिला ग्रुप एकत्रितपणे येऊन चित्रपट पहात आहेत ..

अजून बरेच चित्रपटांबद्दल माहिती आपण घेणार आहोत.. आपण एक मिनिटाच्या विश्रांती नंतर घेऊ पुढचा चित्रपट ..

जाहिरात .. पचनासाठी उत्तम वनदेवी हिंग ..वनदेवी हिंग वापरा आणि जेवणाचा स्वाद वाढवा .. हर घर का स्वाद किंग वनदेवी हिंग ..

तर मी वीजे स्वाती ,तुमच्या सर्वांचे माझ्यातली मी ह्या चॅनल वर मायबॉक्सऑफिस
ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे ..

आता वळूया एका
हिंदी चित्रपटाकडे , “हर बच्चा भगवान का दुलारा ” हा एक स्पोर्ट्स कॉमेडी ड्रामा आहे. हा चित्रपट आर.एन . दत्ता दिग्दर्शित आहे आणि साहिल खन्ना प्रॉडक्शन्स निर्मित आहे.

हा चित्रपट म्हणजे भावनिक कथाकथनाची , हृदयस्पर्शी उत्कृष्ट कृती जो तुमच्या आत्म्याला पहिल्या फ्रेमपासूनच पकडतो
विशेष क्षमता असलेल्या मुलांच्या बाजूने कथा अधिक व्यापक, अधिक समावेशक दृष्टिकोनातून सांगून हा चित्रपट दृष्टिकोन बदलतो.

पटकथा सुंदरपणे थरारली आहे – विनोद, हृदयभंग, निरागसता आणि प्रेरणा यांचे मिश्रण. गती परिपूर्ण आहे, भावनिक क्षणांना कधीही घाई करत नाही आणि प्रत्येक पात्राला श्वास घेण्यास आणि विकसित होण्यास जागा देते.

साहिल खन्ना नेहमीप्रमाणेच, एक उत्कृष्ट कामगिरी करतो – अश्रू आणि हास्य याचा समतोल साधण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे ..सर्व बाल कलाकार जे विशेष आहेत त्याचं काम अप्रतीम आणि वास्तववादी आहे ..
दिग्दर्शन संवेदनशील असल्याने हा चित्रपट मुलांवर सहानुभूती दाखवण्यास सांगत नाही तर तो तुम्हाला त्यांना समजून घेण्यास, भाग पाडतो. चित्रपटात असे संवाद आहेत जे थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही तुमच्या लक्षात राहतात.

थोडक्यात हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही – तो शिक्षण देतो आणि जागृत करतो.

तर प्रत्येक व्यक्तीने अवश्य पाहावा असा चित्रपट “हर बच्चा भगवान का दुलारा ”

जगभरात या चित्रपटाने ₹२६१ कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.

पुढचा चित्रपट घेण्याआधी आपण थोडी विश्रांती घेऊ .कुठेही जाऊ नका ,आपण लगेच भेटू पुढचा चित्रपट घेऊन ..

जाहिरात …टेस्ट मे बेस्ट , मम्मी और एव्हरेस्ट ..एव्हरेस्ट पावभाजी मसाला , एव्हरेस्ट चना मसाला .

तर मी वीजे स्वाती ,तुमच्या सर्वांचे माझ्यातली मी ह्या चॅनल वर मायबॉक्सऑफिस
ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे ..

पुढच्या चित्रपटा बद्दल तुम्हाला सगळ्यांना आधीच माहित आहे , हा चित्रपट १० वर्षांपूर्वी च चित्रपट गृहात तुफान धुमाकूळ घालून गेला ..आणि आता पुन्हा हा चित्रपट, चित्रपट गृहात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक, निर्माते साईराज गुंजाळ ह्यांनी घेतला आहे , तर ह्या चित्रपटाचे नाव आहे “येड लागलं प्रेमाच”

दहा वर्षांपूर्वी चा मराठी ब्लॉकबस्टर “येड लागलं प्रेमाच”
पिंकी आणि राकेश अभिनीत एक रोमँटिक पण ट्रॅजेडी ड्रामा प्रदर्शित होताच देशभरात खळबळ उडाली.

मार्मिक प्रेमकथा , सामाजिक संघर्ष , अप्रतिम संगीत , कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय हे ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य

४ कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये बनवण्यात आलेला असूनही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडले आणि जगभरात ११० कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली. एकट्या भारतात, त्याने १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून त्याचा दर्जा मजबूत केला.

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा परतण्यासाठी सज्ज झाला आहे, त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला.

अगदी अल्पसा ब्रेक आणि लगेच परत येऊ या ..

वॉशिंग पावडर निरमा ,वॉशिंग पावडर निरमा, दूध की सफेदी निरमा से लाये, सब की पसंद निरमा ..

तर मी वीजे स्वाती ,तुमच्या सर्वांचे माझ्यातली मी ह्या चॅनल वर मायबॉक्सऑफिस
ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे ..

पुढचा चित्रपट जो आहे तो अजून ही प्रदर्शित झाला नाही आहे पण प्रदर्शनापूर्वीच ह्या मराठी चित्रपटा ने
राज्यस्तरीय , राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये ही बाजी मारली आहे

भावना,प्रेम, संघर्ष याच्याही पुढे जाऊन खूप वेगळ्या पद्धतीनें मांडलेला वेरा फिल्म्स निर्मित ” ऊत भावनांचा उद्रेक ” हा मराठी चित्रपट राम मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे .

ह्या चित्रपटाला मलेशिया इंटरनॅशनल फिल्म महोत्सवात बेस्ट एशिया फिल्म ॲवॉर्ड
तसेच फ्रान्स येथे कान्स महोत्सवात ही चित्रपट दाखवला गेला . निर्माता, नायक राज मिसाळ नवोदित असून ही त्याला बेस्ट डेब्यूट अँक्टर चे पुरस्कार मिळाले आहेत .
हा मराठी चित्रपट लवकरच चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे . त्यासाठी मी ही खूप उत्सुक आहे ..

ये रे ये रे नशीब 3 हा चित्रपट ही लवकरच प्रदर्शित होणार आहे ..ये रे ये रे नशीब 1,ये रे ये रे नशीब 2 ह्या दोन्ही पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रचंड यश मिळालं असल्याने ये रे ये रे नशीब 3 ह्या चित्रपटाबद्दल ही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत ..ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ही मी प्रचंड उत्सुक आहे ..

नरहरी , नंदिनी रे, मानसिंग राठोड ह्यासारखे काही चित्रपट मात्र इतके कलेक्शन करू शकले नाही आणि बॉक्स ऑफिस वर आपला जलवा दाखवू शकले नाहीत ..

तर मी स्वाती वीजे आज च्या कार्यक्रमाची सांगता करताना तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते आहे की खुश रहा ,मजेत रहा , आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमीच माझ्यातलीमी ह्या चॅनल वर मायबॉक्सऑफिस
हा कार्यक्रम पहात रहा आणि मस्त एंजॉय करा .
यू ही कट जायेगा सफर साथ चलनेसे की मंजिल आयेगी साथ चलनेसे , हम है राही प्यार के ……

चला मग मी वीजे स्वाती आपल्या सगळ्यांचा निरोप घेते ,
भेटूया उद्या पुन्हा ह्याच वेळी , नवीन चित्रपट चित्रपटां सकट, ह्याच माझ्यातली मी ह्या चॅनल वर , आपल्या ५ च्या मायबॉक्सऑफिस
ह्या कार्यक्रमामध्ये .

सौ स्वाती येवले

20 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!