विकेंड टास्क, बॉक्स ऑफिस, ब्लॉग लेखन

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क(१/८/२५)
#बॉक्स ऑफिस.

मी व्हीजे स्मिता,
पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे “बॉक्स ऑफिस “या शोमध्ये स्वागत करते!.

आज आपण पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीच्या जगतात डोकावणार आहोत. दर आठवड्याला नवनवीन कथा, चेहरे आणि अनुभव प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतो. या आठवड्यात कोणत्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला? कोणत्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मन जिंकली? आणि कोणत्या चित्रपटांना यश मिळवण्यासाठी आणखीन संघर्ष करावा लागला…..

पाहूया तर मग….
” विक्रांत” ची तुफान कमाई आणि यशाची कारणे:-

या आठवड्यात सर्वात जास्त चर्चा आहे ती,” विक्रांत” या चित्रपटाची. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांवर आणि बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. ज्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपट गृहाकडे वळाले.
पहिल्या तीन दिवसातच या चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. या यशामागे चित्रपटाची उत्कृष्ट कथा, कलाकारांचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शकांचे उत्कृष्ट कौशल्य हेच मुख्य कारण आहे.
” विक्रांत” ने प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव दिला आहे जो ते अनेक दिवसापासून शोधत होते.

” लव्ह स्टोरी टू ” ची संमिश्र प्रतिक्रिया आणि फ्लॉप होण्याची कारणे पाहूया….

या आठवड्यात प्रदर्शित झालेला आणखीन एक चित्रपट म्हणजे,” लव्ह स्टोरी टू” च्या पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर या चित्रपटाकडून सर्वांच्याच खूप अपेक्षा होत्या, पण दुर्दैवाने चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. चित्रपटाची कथा जुनीच शिवाय नाविन्य काही नाही त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला फारसा प्रतिसाद दिला नाही.
पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने फक्त आठ कोटींची कमाई केली. जी अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. जुनाट, घिसे पिटे संवाद, कमकुवत पटकथा यामुळे” लव्ह स्टोरी टू” फ्लॉप ठरण्याची शक्यता जास्त आहे.

” ड्रीम गर्ल” अजूनही प्रेक्षकांच्या पसंतीस:-

गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला,” ड्रीम गर्ल” हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. चित्रपटाची हलकीफुलकी कथा, विनोदाचा अचूक वापर आणि सहकुटुंब पाहण्यासारखा चित्रपट. याच दरम्यान अनेक नवीन चित्रपट आले असले तरीही,” ड्रीम गर्ल” ने आपले स्थान टिकून ठेवण्यात यश मिळवले. आत्तापर्यंत शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आणि तो लवकरच ब्लॉकबस्टरच्या श्रेणीत सामील होईल अशी आशा आहे.

( चला घेऊया एक छोट्या जाहिरातीचा ब्रेक.
इथे जाहिरात दाखवली जाते….)

ब्रेकनंतर पुन्हा आपले स्वागत आहे बॉक्स ऑफिस मध्ये.
चला पाहूया पुढच्या आठवड्यात कोणकोणते नवीन चित्रपट येणार आहेत…..
“बहादुर”हा ॲक्शन चित्रपट येतोय.
आणि या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षाही आहेत. तुम्हाला काय वाटतं? हा चित्रपट शंभर कोटींचा टप्पा गाठेल?
तुमचा कौल आम्हाला बॉक्स ऑफिस प्रेडिक्शन या हॅशटॅग वर नक्की कळवा.

तर हे होते या आठवड्याच्या बॉक्स ऑफिस वरील काही महत्त्वाचे आकडे आणि निरीक्षणे…..
पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया….. नव्या चित्रपटांच्या आणि त्याच्या कमाईच्या गप्पांसोबत.

तोपर्यंत चित्रपट पाहत रहा आणि तुमचे मनोरंजन करत रहा!.
मी स्मिता, बॉक्स ऑफिस कडून तुमचा निरोप घेते.

सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

4 Comments

  1. Нужен трафик и лиды? реклама в яндекс директ SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!