विकेंडटास्क…. बाॅक्स ऑफिस शो (१/८/२५)
….. नवीन चित्रपटांचा लेखाजोखा……
नमस्कार…. मंडळी, मी व्हिजे जयश्री, आपले बाॅक्स ऑफिस शो मध्ये स्वागत करते. आज महिन्याचा शेवटचा शुक्रवार म्हणजे आपल्या आवडीचा विषय…. आज नवीन प्रदर्शित झालेला व या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा लेखाजोखा घ्यायचा दिवस.
तूमची आवडती जोडी कोणती ….. हे मला माहीत आहे . तर याच जोडीचा…… विचार कसला करताय, राधिका व आयुष यांची जोडी. काय ?…. बरोबर ओळखले की नाही…. तर यांचा “आम्ही जावा जावा ” हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. मी याची गोष्ट अजिबात सांगणार नाही, कारण मग चित्रपट बघायची उत्सुकता कमी होईल ना तूमची…. काय खरं की नाही? फक्त या चित्रपटातील हे गाणे ऐका. तुम्हाला नक्की आवडेल.
गाण…… किती हसवशील तू मला, …….
जाहिरात…… रमा व अशोक यांचा नवा विनोदी चित्रपट ” हि वीण का उसवली.” नक्की पोट धरून हसायला या……
नमस्कार, मंडळी….. ब्रेक नंतर तूमच्या सर्वांचे स्वागत. मंडळी मागच्या आठवड्यातील, ” जमले बरं का ” या चित्रपटाने खूप निराशा केली. यात काम करणारे सगळेच कलाकार नवीन होते त्यामुळे त्यांना अजून खूप मेहनत घ्यायला हवी आहे असे सर्वत्र बोलले जात आहे. जमेची बाजू म्हणजे यातील, कवी वसंत यांनी लिहून संगीतबद्ध केलेली व मनिषा आणि सुबोध यांच्या सुरेल आवाजातील गाणी गुणगुणावीशी वाटतात. सध्या हे गाणे… पावसात भेटलीस तू…. धुमाकूळ घालत आहे. हे गाणे ऐका गुणगुणत रहा. तेवढ्यात मी आलेच.
नमस्कार, मंडळी…. काय कोणी भेटले की, नाही पावसात? आता नाही पण ….आधी कोणी भेटले की नाही ? नसेल तर नक्की भेटेल.
माधव यांची मुख्य भूमिका असलेला, ” माझा हिरो शिवाजी, ” बघितला की, नाही….. बाल शिवाजीचे काम करणारा, प्रथमेश आवडला की नाही? लहान असून त्याने बाल शिवाजीची भूमिका अगदी सहजपणे केली आहे. या वर्षीचे बालकलाकारचे बक्षीस तो नक्की मिळवणार असे दिसते.
तुम्हाला निसर्ग सौंदर्याची आवड असेल तर,” चला भटकायला ” हा सिनेमा नक्की बघा. आपल्या देशातही कितीतरी निसर्ग सौंदर्याने समृध्द असलेले प्रदेश व वेगवेगळ्या भाषा, सणवार, पेहराव, चालीरीती या एकता में अनेकता तुम्हाला जवळून बघायला मिळेल.
मंडळी, या महिन्यातील सर्व चित्रपटांची धावती भेट मी तुम्हांला घडवली आहे. पण एक विनंती, सगळे पडद्या समोरचे व पडद्या मागचे कलाकार आपले मनोरंजन करण्यासाठी झटत आहेत. आपल्या मराठी भाषेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा चित्रपट नेहमी चित्रपट गृहातच जाऊन बघा व त्यांच्या मेहनतीला न्याय द्या.
मंडळी, आज बरेच चित्रपट ऐरणीवर असल्याने, तूमचे अभिप्राय फोनवर घेता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा. पुढच्या वेळी तूम्ही कोणते चित्रपट बघितले व तुम्हाला कसे वाटले, हे मी नक्की विचारणार आहे. तेव्हा ऑनलाईन तिकीटं बुक करा. आपल्या लोकांबरोबर मनोरंजनाची मेजवानी लुटा.
मंडळी, आता आपली भेट पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, याच वेळी याच ठिकाणी. तो पर्यंत बाय. …बाय…. तूमच्या व्हिजे जयश्रीला रजा द्या. धन्यवाद मंडळी. बाय… बाय…. फिर मिलेंगे.
********************
