#माझ्यातलीमी
#कथा
#साथ

#साथ

अन्वी. एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी भावूक आणि मनस्वी चित्रकार. तिचं जग म्हणजे रंग, कॅनव्हास, प्रदर्शनं आणि स्वप्नांची धुंदी. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. कोणीची सावली नको होती.
अगदी तिच्या उलट असणारा
तो ईशान. एक गूढ, शांत, संयमी सॉफ्टवेअर इंजिनिअर. तंत्रज्ञानाच्या दुनियेत रमलेला, पण स्वतःच्या मर्यादेत जगणारा. बाहेरून थंड, पण आतून खोल , न उलगडता येणारा.

दोघांची भेट एका आर्ट गॅलरीत झाली. ती त्याच्या डोळ्यात स्थिरतेचा गूढ भाव पाहते. तो तिच्या चित्रांमध्ये एक अनोखा वेग, एक प्रकारची शक्ती अनुभवतो. हळूहळू भेटी वाढतात. गप्पा रंगतात. अन्वीच्या प्रश्नांना ईशानचं शांत उत्तर असायचं, आणि ईशानच्या मौनाला अन्वीचा रंगीत स्पर्श असायचा.दोघे भविष्याची स्वप्नं रंगवत होती.

पण आयुष्य सरळ कुठे असते?
अन्वीच्या करिअरचा वेग आणि स्वप्नं वेगळी होती आणि ईशानचं जग ठराविक, नियमबद्ध. एक क्षण असा येतो, जेव्हा अन्वी म्हणते, “माझं स्वतंत्र अस्तित्व जपायचंय मला. ते ही कोणाच्या आधारावर नाही .मला स्वतंत्र माझी ओळख हवी आहे
ईशान फक्त हसतो, म्हणतो, “तुझी शक्ती तू आहेस. मी फक्त तुझा आधार. तुझं आकाश तूच रंगव अन्वी.

काही काळ विरक्तीचा. दोघं आपापल्या वाटेवर एकटे चालत राहतात.
एक मोठं आर्ट प्रदर्शन भरते त्यात अन्वी चे पेंटिंग जबरदस्त विक्री होते. आयुष्य बदलणारं क्षण. पण तिला जाणवतं , तिच्या यशामागे कुणीतरी तिचा ‘शिव’ आहे. तो तिच्या कलेला समजून घेणारा, तिच्या वादळांना शांत करणारा.

ती ईशान कडे परत जाते. म्हणते, “शक्तीला शिवाची साथ हवी असते, ती अधीन राहण्यासाठी नाही, तर पूर्ण होण्यासाठी.”

तो फक्त स्मित करतो. दोघं पुन्हा एकत्र.
प्रेमात, आदरात, स्वतंत्र असूनही एकमेकांत सामावलेले आजच्या काळातलं शिवशक्तीचं खरं रूप.

शेवटी, प्रेम म्हणजे मालकी नव्हे… ती एक ऊर्जा आहे, जी दोघांना अधिक ‘स्व’ बनवते.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!