मृण्मयी आणि संकेतचं लग्न होऊन सहाच महिने झाले होते, आणि सुधाताईंना-मृण्मयीच्या सासूबाईंना-कर्करोग झाल्याचं निदान झालं. संकेतच्या विनंतीचा मान राखून मृण्मयीनं तिची नोकरी सोडली. सासूबाईंची तिने मनोभावे सेवा केली. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर सई आणि सौम्य नांवाची दोन सुंदर फुलंही उमलली. पण दैवाला तिचं एवढंही सुख पाहवलं नाही. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना संकेतचा अपघात झाला आणि तो अंथरुणाला खिळला. सहा महिने वाट बघून त्याच्या बॉसने त्याला कामावर ठेवण्यास असमर्थता दर्शवली. संकेत कोलमडून पडला. पण मृणयी त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. अंगच्या कलेचा वापर करत तिने जवळपासच्या दुकानांमधे शोभेच्या वस्तूंचा पुरवठा करायला सुरुवात केली. संसाररथ एका चाकावर तोलून धरला. तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याची शक्ती होऊन राहिली.
(शब्दसंख्या -१०५)
-©️®️अनुपमा मांडके
२८/०७/२०२५
