चित्रावरून शतशब्दकथा (२९/७/३५)
….. एक दुजे के लिए ….
सुबोधने लहानपणी आईबाबांचा मृत्यू बघितल्याने तो सतत घाबरलेला, स्वतःच्या तंद्रीत असायचा. त्यामुळे तो मुलांत मिसळायचा नाही. तो मामाकडे रहायचा. शेजारी प्राची राहायची. तो फक्त तिच्याशी बोलायचा. दोघांची चांगली मैत्री होती. अपघात आठवला की तो घाबरायचा, ओरडायचा त्यावेळी प्राची त्याचा हातावर थोपटायची, हातात हात धरून ठेवायची. त्या स्पर्शात धीर, प्रेम असायचे सुबोध मग शांत व्हायचा. दोघेही शाळा, मग काॅलेज व नंतर नोकरी एकाच ठिकाणी करत होते. त्याने प्राचीला लग्नाची मागणी घातली व म्हणाला, जशी लहानपणापासून तू मला साथ दिलीस तशीच पुढे आयुष्यभर साथ देशील का? प्राचीचे पण त्याचावर प्रेम होते. घरातल्यांनी दोघांचे लग्न लावून दिले कारण त्यांना माहीत होते की, दोघेही एक दुजे के लिए आहेत.
शब्द संख्या १०९
