#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(२८/०७/२०२५)
# स्वप्नीलकळ्या 🥀
*”आजही ते माझ्यासाठी प्रेरणा”*
पैलतीराकडे नजर जाते;तेव्हा दडपण न येता पतीसह दोन तपाचे साहचर्य मला आश्वस्त करते.
संसार कोणाचाही असो-अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाणारा प्रवास असतो.
सीता-राम,राधे-श्याम नावे उच्चारली जातात.युगानुयुगे केला जाणारा उल्लेख म्हणजेच साहचर्याचे अलौकिकत्व .
सनातनधर्मानुसार दांपत्याकडून नुसता वंशविस्तार अभिप्रेत नसतो.दैनंदिन बाबींच्यापलीकडे आत्मिक उन्नतीही व्हायला हवीच.
देवकरमॅडमनी
——————
लिहिल्याप्रमाणे पतीपत्नीचे नाते
म्हणजे प्रेम,समर्पण,सहकार्य….
स्थैर्य,शांतीसाठी.
हेच संस्कार पुढील पिढीला देण्यात आम्ही सफल झालो आहोत.
पती माझे प्रेरणास्थानच.आमचे साहचर्याचे नाते आत्मिक एकतेचे प्रतिक ठरले;कारण,माझ्यातल्या सुप्त गुणांना त्यांनी जागवलं .
संसारवेलीवर फूल फुललं.नंतर सृजनाचा एक नवा अध्यायही चालू झाला.काव्यसंग्रहदेखील प्रकाशित झाला.आजही मी सरस्वतीची सेवा मनोभावे करत आहे.
अटळ नियतीचा स्वीकार केलाय;पण भावनिक पंगुता नाही.खरंच,मी खूपच हळवी,कोमल, भावनाप्रधान त्यांनी मला मजबूतही केलं..माझ्यात बदल घडवला.आजही वाटतं..ते दाद देतायत..समरसून ऐकतायत… आजही पोचतंय काव्य त्यांच्यापर्यंत.
टीप सोडून १०७ शब्द
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
टीप..
कुटुंबाबरोबरच समाज,देश या कोषांमध्येही काहीतरी करुन दाखविणाऱी जोडी म्हणजे म.ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले.त्यांनी तिलाही आदरपूर्वक शिक्षित,सक्षम केले,आणि मग साथ ठरली..शिक्षणप्रसार करून मौलिक कार्यातली भर.आज आपण स्त्रिया जे आहोत;त्यासाठी त्यांचे ऋणी आहोत.#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(२८/०७/२०२५)
# स्वप्नीलकळ्या 🥀
*”आजही ते माझ्यासाठी प्रेरणा”*
पैलतीराकडे नजर जाते;तेव्हा दडपण न येता पतीसह दोन तपाचे साहचर्य मला आश्वस्त करते.
संसार कोणाचाही असो-अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाणारा प्रवास असतो.
सीता-राम,राधे-श्याम नावे उच्चारली जातात.युगानुयुगे केला जाणारा उल्लेख म्हणजेच साहचर्याचे अलौकिकत्व .
सनातनधर्मानुसार दांपत्याकडून नुसता वंशविस्तार अभिप्रेत नसतो.दैनंदिन बाबींच्यापलीकडे आत्मिक उन्नतीही व्हायला हवीच.
देवकरमॅडमनी
——————
लिहिल्याप्रमाणे पतीपत्नीचे नाते
म्हणजे प्रेम,समर्पण,सहकार्य….
स्थैर्य,शांतीसाठी.
हेच संस्कार पुढील पिढीला देण्यात आम्ही सफल झालो आहोत.
पती माझे प्रेरणास्थानच.आमचे साहचर्याचे नाते आत्मिक एकतेचे प्रतिक ठरले;कारण,माझ्यातल्या सुप्त गुणांना त्यांनी जागवलं .
संसारवेलीवर फूल फुललं.नंतर सृजनाचा एक नवा अध्यायही चालू झाला.काव्यसंग्रहदेखील प्रकाशित झाला.आजही मी सरस्वतीची सेवा मनोभावे करत आहे.
अटळ नियतीचा स्वीकार केलाय;पण भावनिक पंगुता नाही.खरंच,मी खूपच हळवी,कोमल, भावनाप्रधान त्यांनी मला मजबूतही केलं..माझ्यात बदल घडवला.आजही वाटतं..ते दाद देतायत..समरसून ऐकतायत… आजही पोचतंय काव्य त्यांच्यापर्यंत.
टीप सोडून १०७ शब्द
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
टीप..
कुटुंबाबरोबरच समाज,देश या कोषांमध्येही काहीतरी करुन दाखविणाऱी जोडी म्हणजे म.ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले.त्यांनी तिलाही आदरपूर्वक शिक्षित,सक्षम केले,आणि मग साथ ठरली..शिक्षणप्रसार करून मौलिक कार्यातली भर.आज आपण स्त्रिया जे आहोत;त्यासाठी त्यांचे ऋणी आहोत.