शतशब्द कथा.
कथेचे शीर्षक :- ” पूर्णत्व”.
गौरी उत्तम शिल्पकार होती. शांत, संयमी तिचं काम नेमकं पण भावनाहीन वाटायचं. सोहम चित्रकार. रंगांशी खेळणारा, पण विस्कळीत.
दोघं एकाच मूर्तीवर काम करत होते…” शिवशक्तीची मूर्ती”.
गौरीच्या रेषांना सोहम चे रंग लाभले.
आणि सोहम च्या रंगांना गौरीची शिस्त.
काम करताना भांडणे, मतभेदही झाले पण त्यांचे अंतिम ध्येय एकच,” देवत्वाचा स्पर्श”. ते दोघे मनापासून एकत्र होते, तत्त्वतःही.
मूर्ति पूर्ण झाली तेव्हा ग्रामस्थ म्हणाले,” ही मूर्ती वेगळीच…. यात सौंदर्य आहे, चैतन्य आहे आणि शांतता…
गौरी हसली म्हणाली,” एकट्या शिवाने ऊर्जा नाही, एकट्या शक्तीने दिशा नाही. दोघे मिळाले म्हणून पूर्णत्व.
सोहम म्हणाला,” जसं ब्रम्हांडाच्या संतुलनासाठी शिवशक्तीचं मिलन आवश्यक, तसंच सर्जनातही तत्त्वज्ञान आणि भावना यांचं मिलन हवचं!”
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
