#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
**रणरागिणी**
महेश स्वतःवरच चिडला होता , खचला होता .त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याच्या भावाने दिलेल्या कागदपत्रांवर त्याने न वाचता सह्या केल्या .त्याने महेशला घर ,व्यवसायातून हाकलून लावलं
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी
उमाने महेशला तिचे सर्व दागिने विकायला सांगितले .
उमा, तू माझ्याशी घरच्यांशी भांडून लग्न केलेलं आणि माझ्यामुळे तुझ्यावर लंकेची पार्वती होण्याची वेळ आली ..
महेश, आता रडायचं नाही तर लढायच ..
दोघांनी मेहनत करून स्वतःचा व्यवसाय उभा केला
थोडे पैसे आल्यावर भावाविरुद्ध ,न्यायालयात जाऊन दाद मागितली .सत्याचा विजय झाला ,महेशला त्याच्या हक्काच परत मिळालं ..
उमा , मी महादेव भक्त आहे म्हणून मला तू माझी पार्वती, रणरागिणी मिळाली.
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या १००

